
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे इंदापूर:विकृत प्रवृत्तीच्या मनोहर भिडे यास तात्काळ अटक करा अशी मागणी सावता परिषद च्या वतीने इंदापूर तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी साहेब मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित दादा पवार,उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे सावता परिषदेची मागणी केली आहे. विकृत प्रवृत्तीचे मनोहर भिडे यांनी अनेक वेळा राष्ट्रपिता शिक्षण महर्षी महात्मा फुले राष्ट्रपिता महात्मा गांधी देशाचे मा पंतप्रधान पंडित नेहरू, राजाराम मोहन राय यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करून प्रचंड समाज बांधवांच्या भावना प्रचंड दुखावलेले आहेत.मनोहर भिडे यांच्या बद्दल समाजामध्ये प्रचंड चीड निर्माण झालेले आहे. या वक्तव्याचा सावता परिषदेच्या वतीने आम्ही जाहीर जाहीर निषेध करतो व मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री.गृहमंत्री महोदय यांना विनंती करतो की या मनोहर भिडे ला तात्काळ अटक करा व याचे इथून पुढे होणारे सर्व कार्यक्रमावरती बंदी घाला. व कायदेशीर मार्गाने कठोरात कठोर कारवाई करावी.. अन्यथा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन अधिक तीव्र करून रास्ता रोको व निरनिराळ्या मार्गाने महाराष्ट्रभर आंदोलन उभा केले जाईल असा खणखणीत इशारा सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक तथा रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया चे प्रोजेक्ट डायरेक्टर संतोष राजगुरू व इंदापूर तालुका अध्यक्ष प्रकाश नेवसे यांनी दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे म्हणाले राष्ट्रपिता बहुजन नायक शिक्षण महर्षी महात्मा फुले राष्ट्रपिता महात्मा गांधी देशाचे मा पंतप्रधान पंडित नेहरू राजा राम मोहन राय यांच्या बद्दल मनोविकृत मनोहर भिडे यांनी बेताल वक्तव्य केलेला आहे या बेताल वक्तव्याचा मी जाहीरपणे निषेध करतो व त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करतो. इंदापूर नगरपरिषदेचे नगरसेवक व विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे म्हणाले की मनोहर भिडे यांच्या या वक्तव्याचा मी जाहीरपणे निषेध करतो व त्याच्या अटकेची मागणी करतो व त्याच्यावर योग्य ती कारवाई करून त्याचं हे गरळ ओकणे तात्काळ थांबवावं अशी मागणी केली. यावेळी संतोष राजगुरू म्हणाले मनोवृत्ती विकृत मनोहर भिडे महापुरुषाबद्दल सातत्याने चुकीचा इतिहास सांगतो सतत महापुरुषांचे बदनामी करतो. याच्या पाठीमागे नक्की कोण आहे याचा खुलासा सरकारने करावा. समाज बांधवांमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेले आहे समाज बांधवांच्या खूप भावना दुखावलेले आहेत.
यावेळी उपस्थित सावता परिषदेचे प्रदेश मुख्य संघटक संतोष राजगुरू, इंदापूर तालुका सावता परिषदेचे अध्यक्ष प्रकाशने नेवसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, इंदापूर नगरपरिषदेचे नगरसेवक विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे मा संचालक विजयराव हेगडे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संदीप भोंग,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा छाया पडसळकर, ॲड. रेश्मा गारडे, ॲड. नितीन राजगुरू, युवा नेते बापू बोराटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब व्यवहारे, सावता परिषदेचे कार्याध्यक्ष विष्णू ,पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल ननवरे, तालुका संघटक सुहास बोराटे, तालुका सोशल मीडिया प्रमुख सचिन शिंदे, सावता परिषदेचे युवा इंदापूर तालुका अजय गवळी,विकास सोसायटीचे मा संचालक विजय महाजन, संचालक महादेव शेंडे,पक्षी मित्र संघटना धनंजय राऊत, हर्षल व्यवहारे,ह.भ.प. राघू व्यवहारे, मार्गदर्शक रामदास बनसोडे, दादा गारडे, दादासाहेब भिसे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.