
अली मुस्तफा शेख चे होतेय सर्वत्र कौतुक…
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
सोलापूर/माढा: माढा तालुक्यातील टेंभूर्णी येथील नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने नरसिंह नगर येथे सुरू असलेल्या श्री गणेश बांधकामा करीता सर्व स्तरातून योगदान होत आहे. नरसिंह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते देखील मंदिराचे काम पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत.आज सकाळी नरसिंह प्रतिष्ठान चा छोटा कार्यकर्ता अली मुस्तफा शेख वय ११ वर्ष हा स्वतःहून स्वयंस्पुतीने मंदिराच्या बांधकामावर बादलीत पाणी घेऊन पाणी मारत असताना दिसला. लहान असून देखील प्रतिष्ठानच्या प्रत्येक सामाजिक कार्यात तो सर्वात पुढे असतो या त्याच्या मनोभावे करत असलेल्या कार्याचे कौतुक सर्व स्तरातून केले जात आहे.आणि हा चिमुकला अली मुस्तफा शेख हा चिमुकला नरसिंह प्रतिष्ठानचा कार्यकर्ता असल्याचा सार्थ अभिमान आम्हाला नक्कीच आहे.असे नरसिंह प्रतिष्ठानचे सदस्य गणेश गायकवाड यांनी सांगितले.
अली तुझे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे.जन्माने मुस्लिम पण लहानपणा पासून हिंदू मुलासोबत लहानाचा मोठा होत असताना त्यांचा त्याला लळा लागला.खाऊ घालताना, फिरायला जाताना,एकत्र खेळताना,भेटवस्तू देताना, सण-उत्सव साजरे करताना त्यांच्यामध्ये कधीही धर्म आला नाही.आपण कोणत्याही धर्माचे असलो, तरी आधी माणूस आहोत, हा भाव प्रकट करणाऱ्या या नरसिंह प्रतिष्ठानच्या छोट्या कार्यकर्त्याचा आम्हाला नेहमीच हेवा व अभिमान वाटत असतो.