
दैनिक वृत्तसेवा
कंधार :- तालुक्यातील कळका येथील संभाजी तिरूपती गायकवाड यांना किवळा येथील शाळेतील शिक्षक बाचीपाळे यांनी सहा राऊंड चा बार करून तुला खतम करील अशी धमकी दिली असून गल्लीच्छ भाषेत शिव्या देत तुझ्यासाठी सहा राउंड चा माझ्या सोबत आहे. तु कोणत्याही ठिकाणी ये शाळेत ये, सिडको ला ये अशी भ्रमणध्वनी वरून धमकी दिली आहे.त्यामुळे संभाजी गायकवाड यांनी माझ्या जिवाला धोका असून प्रशासनाने मला धमकी दिली त्याची कसून चौकशी करून अनर्थ होण्या अगोदर उपाय योजना करून मला न्याय द्यावा असे त्यांनी म्हटले आहे.