
कर्णाबधिर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप…
अंबाजोगाई (प्रतिनिधी ) लालबहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळ यांच्यावतीने सोमवारी (ता.१४) भारज पाटी येथे ज्ञानसागर निवासी कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
अमर हबीब म्हणाले की, दशरथ शिंदे हे विद्यार्थ्यांत रमणारा संस्थाचालक आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाच हेच त्यांचे ध्येय आहे. त्यांनी शून्यापासून सुरुवात करून आज वटवृक्ष झाला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निलप्रभा ढाणे होत्या. दत्ता भालके , ज्ञानसागर निवासी कर्णबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक बालाजी देशमुख , उपमुख्याध्यापक पाराजी हारे, लेखक अमर हबीब, पत्रकार रमाकांत पाटील, संजय बर्दापूरकर, अम्रत दरगड, सेवानिवृत्त प्राध्यापक किरण कांबळे, रमाप्पा निर्मळे, डॉ. सावजी, विश्वजीत तोतला, परेश मंडलेला यांची प्रमुख उपस्थिती होती.
सूत्रसंचालन तानाजी गायकवाड यांनी केले. आभार मिलिंद शिंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.