
दै.चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
नांदेड (देगलूर): दिनांक 15 ऑगस्ट 2023.. रोजी..उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलुर येथे भारतीय स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीपजी जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले . यावेळी राष्ट्रगीता सह पोलीस प्रशासना द्वारे सलामी देण्यात आली . डॉ. सुनील जाधव यांनी राज्य गीत व देश भक्ति गीत सादर केले …या वेळी प्रमुख उपस्थिती आमदार जितेश अन्तापुरकर , माजी आमदार सुभाषजी साबने, डी.वाय. एस. पी. चन्द्र्सेन देशमुख , तहसीलदार राजाभाऊ कदम , बी डी ओ शेखरजी देशमुख , मुख्याधिकारी सुंदर बोन्दर , नायब तहसिलदार अन्गद नेटके, मिठेवाड बालाजी , पी आय संजय हिबारे ,शिवाजीराव देशमुख बळेगांवकर , माजी नगर अध्यक्ष मोगलाजी शिर्शेटवार , डॉ. मुंडे विनायक , डॉ.भुमे , नितेश पाटील , सुशीलकुमार देगलुरकर , दिगंबर कौरवार , अशोक कांबळे , शफी मामा , दाशटवार ताई , शेख शफी , बालाजी थड्के , अनिल बोनलावार , प्रशांत दासरवाड सह मोठय़ा संख्येने सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना पदाधिकारी , प्रशासकीय अधिकारी , कर्मचारी , विद्यार्थी , शिक्षक , सर्व समाजाचे देशभक्त बांधव , महिला भगिनी , नागरिक उपस्थित होते . या वेळी स्वतंत्र सेनानी / त्यांच्या घरच्या व्यक्तीचे स्वागत , सन्मान करण्यात आला …..सुत्र संचालन सूर्यकांत सुवर्णकार टेलर यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन डॉ. सुनील जाधव यांनी केले व ऐसा देश है मेरा देशभक्ति पर गीत सादर केले ….कार्यक्रम यशस्वीते साठी नायब तहसीलदार अन्गद नेटके , शेख शफी , डॉ. सुनील जाधव , गिरी भाऊ सह उपजिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयाच्या अधिकारी , कर्मचारी आदींनी प्रयत्न केले…