
दै.चालु वार्ता
जिल्हा प्रतिनिधी।किशोर फड बीड अंबाजोगाई
आय सी टी सी चे समुपदेशक श्री धनराज पवार यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून HIV वर माहीती व केले समुपदेशन…
दिनांक 18 ऑगस्ट रोजी पंचायत समिती अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आंबेजोगाई आणि जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय बीड आय सी टी सी केंद्र आणि ग्रामीण विकास मंडळ बनसारोळा यांच्या वतीने आज एच आय व्ही एड्स या विषयावर पंचायत समिती चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी जनजागृती कार्यक्रम माननीय जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोल मुंडे मॅडम यांच्या मार्गदर्शक सुचने नुसार आयोजत करण्यात आला होता या वेळी या पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाणे मॅडम या उपस्थिती होत्या तसेच जिल्हा एडस् नियंत्रण कक्ष बीड चे जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री सुहास कुलकर्णी सर उपास्थित होते यावेळी सर्व प्रथम *स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील बी पी एम टी विद्यार्थ्यांनी एच आय व्ही एड्स या विषयावर पथनाट्य सादरीकरण केले* या नंतर कार्यक्रम सुरुवात झाली नंतर आय सी टी सी चे समुपदेशक श्री धनराज पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यावेळी त्यांनी जिल्हातील सद्या कशा पद्धतीने एच आय व्ही चे प्रमाण कमी झाले आहे याबद्दल माहिती दिली तसेच प्रत्येक घरातील विवाह योग्य मुला मुलींची विवाह करण्यापूर्वी एच आय व्ही ची तपासणी करणे का गरजेचे आहे याचे महत्व सांगितले. त्यानंतर जिल्हा कार्यक्रमाधिकारी श्री सुहास कुलकर्णी यांनी गुप्तरोग टीबी या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले शेवटी गटविकास अधिकारी पंचायत समिती आंबेजोगाई च्या श्रीमती समृद्धी दिवाणे मॅडम यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना एच आय व्ही एड्स या आजारा ची शेवटच्या घटकापर्यंत जनजागृती करावी व जिल्हा नियंत्रण कक्ष व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले शेवटी प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी श्री विश्वास लवंद यांनी उपस्थित कर्मचारी व अधिकारी वर्गाची एच आय व्ही ची तपासणी केली या कार्यक्रमासाठी ग्रामविकास मंडळाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते व त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाला यावेळेस ग्रामविकास मंडळाचे श्री बापू लुंगेकर प्रकल्प व्यवस्थापक तसेच फारूक सर ,रेखा काटे मॅडम ,पांचाळ मॅडम ,अक्षय रामधामी सर यांनी परिश्रम घेतले आभार प्रदर्शन श्री बापू लुंगेकर यांनी केले.