
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर): दि. 17 ते 19 रोजी भरती प्रक्रिया मारुती क्राफ्ट टीचर्स ट्रेनिंग सेंटर दत्त मंदिर जवळ देगलूर येथे घेण्यात आली, या भरतीस उस्फूर्त असा प्रतिसाद भेटला व स्त्री शक्ती मंच संघटना कारंजा लाड द्वारा कार्यकारी अध्यक्षा सौ शारदा भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षा सौ.संगीता कदम,उपाध्यक्षा श्रीमती दिपाली पाटील वडगावकर यांच्या सहकार्याने भव्य असा भरती मेळावा संपन्न होत आहे या कार्यक्रमास श्रीमती शितलताई रावसाहेब अंतापुरकर,रुपेश पाटील भोकसखेडकर,बिरादार सर यांचे विशेष सहकार्य लाभले या तीन दिवसीय शिबिरास सौ.संजीवनी सूर्यवंशी,श्रीमती पुष्पा जाधव,दिव्या गिरी, सौ.वैजंता कांबळे,सौ.संगीता गुजरवाड,सौ.कोमल राठोड, सौ.सुमती लच्छनकर,सौ.मंगल ठाकूर,सौ.रेणुका बोलके,सौ.रेखा निवळे आदी उपस्थित होते.