
दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी बालाजी देशमुख
बीड अंबाजोगाई:-अंबाजोगाई शहरातील सर्व पत्रकार संघटनानी रस्त्यावर उतरून निदर्शने करत राज्यात कुचकामी ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायदयाची प्रतिकात्मक होळी करून मुख्यमंत्री यांना निवेदन दिले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाचोरा येथील पत्रकाराच्या हल्ल्यास कारणीभूत आ किशोर पाटलावर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत, पत्रकारांना लिखाणाचे मुक्त स्वातंत्र्य मिळाचेच पाहीजे, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासनाचा, धिक्कार असो, पत्रकारांना संरक्षण, मिळालेच पाहिजे आदी घोषणा देत निदर्शने करन्यात आली.