
प्रत्येक घर व शाळा रांगोळीने सजल्या…
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
नांदेड (देगलूर):स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप वर्षानिमित्त देगलूर तालुक्यातील येरगी येथे विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. गावातील ग्राम पंचायत कार्यालय,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि सार्वजनिक वाचनालय,स्वस्त धान्य दुकान येथे झेंडावंदन कार्यक्रम उत्साहात पार पडले. तत्पूर्वी संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली यात विद्यार्थी,ग्रामस्थ विशेष म्हणजे गावातील वयोवृद्ध नागरिकांचा उल्लेखनीय सहभाग होता .
तसेच गावातील मुख्य जागेवर ग्रामपंचायत कडून स्वातंत्र्य सैनिक व हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करणारे शिलाफलक लावण्यात आले.
ग्रामपंचायत कडून अमृत वाटिका तयार करण्यात आले असून त्यात 75 रोपटे लावून व त्यास लोखंडी ट्री गार्ड बसवण्यात आले.
सर्व उपस्थितांनी हातात मातीचे दिवे घेऊन पंच प्रण शपथ घेतली.
तसेच येरगी परिसरातील माती घेऊन दिल्ली येथील अमृत वाटिकेसाठी सन्मानपूर्वक पाठवण्यात आली.
येरगीचे युवा सरपंच संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील तीन वर्षापासून गावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी विशेष परिश्रम घेतले जात आहेत.
यावर्षी आझादी का अमृत महोत्सवाच्या समारोप प्रसंगी हर घर तिरंगा चा नारा देत गावातील 300 घरांवर तिरंगा ध्वज लावण्यात आले. यामुळे येरगी हे गावातील सर्व घरांवर तिरंगा लावणारे प्रथम गाव ठरले.13,14 व 15 ऑगस्ट या तीन दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या तिन्ही दिवसामध्ये
गवतील प्रत्येक घरासमोर स्वयंस्फूर्तीने रांगोळ्या काढण्यात आल्या होते.यामुळे गावात उत्सवाचे वातावरण तयार झाले होते.
देशभक्तीपर गीत वाजवत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली होती यात शाळकरी विद्यार्थ्यांसह गावातील सर्व महिला – पुरुष उत्साहाने सहभागी झाले होते.यात देशभक्ती गीतावर अगदी 90 वर्षाच्या नागरिकांनी ही हातात झेंडे घेऊन ठेका धरला होता.तर याच गीतांवर शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. विविध देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण येरगी परिसर दुमदुमून गेला होता.
स्वातंत्र्य दिवसनिमित्त एवढ्या कार्यक्रमांचे सुंदर आयोजन गावच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले असल्याचे ज्येष्ठांनी बोलून दाखवले.
आझादी का अमृत महोत्सवासाठी सरपंच, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळेतील शिक्षक, सर्व गावातील नागरिक व ज्येष्ठ नागरिकांनी परिश्रम घेतले.