
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर): देगलूर – नांदेड राज्य महामार्गावरील असलेल्या बिलोली तालुक्यातील अटकळी बसस्थानकाजवळ १९ ऑगस्ट २०२३ रोजी पहाटे ३.३० वाजता दोन आयश्चर टेम्पो एकमेकांवर धडकून झालेल्या भीषण अपघातात एक जागीच ठार झाला असून. ही घटना अटकळी जवळ घडली आहे.
अपघातात पियुशी पाईपने भरुन असलेल्या आयश्चर क्रमांक एम. पी. ०९ जी. एफ. ५४८६ मध्ये वाहन चालक व दुसरा आगाऊ ( दुहेरी ) चालक बसून असलेल्यापैकी दुहेरी ( आगाऊ ) वाहन चालक युसुफ अब्दुल रहीमसाब खान ( ६० ) रा. इंदौर ( मध्यप्रदेश ) याचा जागीच मृत्यू झाला. तर मुख्य आयश्वर चालक झाकीर खान हा सुखरूप बचावला आहे. तसेच दुसरा प्लास्टिकचे रिकामे कॅरेट भरुन असलेला आयश्चर टेम्पो क्रमांक टी. एस. १५ यु. ए. ७२०२ चा चालक व क्लिनर हे मात्र घटनास्थळावर दिसून आले नाहीत, ते सुखरूप आहेत. की जखमी अवस्थेत आहेत, याविषयी काही माहिती मिळू शकली नाही. घटनेची माहिती मिळतात रामतीर्थ पोलिस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे व बीट जमादार प्रकाश तमलूरे, पोलिस कर्मचारी व्यंकट बोडके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
आयश्चर टेम्पो क्रमांक एम.पी. ०९ जी.एफ. ५४८६ हा पियुशी पाईप घेऊन नांदेडहून नरसी – देगलूरमार्गे हैदराबादकडे जात होता. त्याचवेळी हैदराबादहून आयश्वर टेम्पो क्रमांक टी. एस. १५ यु.ए. ७२०२ प्लास्टिकचे रिकामे कॅरेट घेऊन देगलूर – नरसीमार्गे नांदेडकडे जात होता. पहाटे ३.३० दोन्ही आयश्चर टेम्पो बिलोली तालुक्यातील अटकळी बसस्थानक परिसराजवळ आले असता. एकमेकांवर धडकून भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांची समोरील बाजू चंदामेंदा झाली. पुढील कारवाई रामतीर्थ पोलीस करत आहेत.