गंगापुर येथील शिष्टमंडळाने घेतली मा खासदार शरद पवार यांची भेट
दैनिक चालु वार्ता गंगापुर प्रतिनिधि
गंगापूर : राज्यातील १ हेक्टरच्या आतील अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रतिमहा १० हजार रुपये रोजगार हमी भत्ता व युवकांना २० लाखांच्या आत बिनव्याजी व्यवसाय कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याची मागणी खासदार शरद पवार यांच्याकडे ‘छावा’चे मराठवाडा अध्यक्ष डॉ. उद्धव काळे-पाटील यांनी नुकतीच केलीराज्यात दरवर्षी अवेळी पडणारा पाऊस, जाचक अटी, शासन प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे शेतकऱ्याच्या नुकसानीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, बळीराजा टोकाचे पाऊल उचलत आहे. यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना १० हजार रुपये प्रतिमहा रोजगार हमी भत्ता मिळावा, अशी मागणी त्यांनी केली असून यासाठी आपण शासन स्तरावर होते.
पाठपुरावा करावा, अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे पवार यांना भेटून नुकतीच करण्यात आली. याबाबत पाठपुरावा करण्याचे शरद पवार यांनी आश्वासन दिले
यावेळी शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण, व्याख्याते विशाल गायकवाड, एमकेसीएलचे योगेश धोत्रे आदी उपस्थीत होते…
