शेतकऱ्यांत असंतोषाचे वातावरण…
सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. कोळपणी, फवारणी,खुरपणीची कामे धडाक्यात सुरू आहेत. अशावेळी शेतकऱ्यांना थेट शेतावर कृषी सहायक व अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळणे अपेक्षित आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही. कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कृषी क्षेत्राशी निगडित तांत्रिक कामे सोडून कोणत्या कामात गुंग आहे आहे. परिणामी शेतकऱ्यांवर मार्गदर्शन व कर्मचारी मिळणे दुर्लभ झाल्याने शेतकऱ्यांत असंतोषाचे वातावरण आहे. खरीप हंगाम सुरू होताच कृषी विभागाचे काम वाढते.
बीज प्रक्रिया कशी करावी. जमिनीची आरोग्य पत्रिका कशी व कुठे तयार करायची. खत, पिकांची निवड कशी करायची. कपाशी व स्वायाबीन पिकांवरील कीड नियंत्रणाची उपाययोजना कशी करायची. रोपवाटिका तयार करतानाकाय काळजी घ्यावी, हिरवळीच्या खतांचे महत्त्व काय, कोणत्या हिरवळीच्या पिकांचा वापर करावा. बेड पद्धतीने स्वायाबीन लागवड, चारसूत्री पद्धत, कीड व रोग व्यवस्थापन आदी तांत्रिक कामे कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना पार पाडावी लागतात.या वर्षी पाऊस कमिअसल्यामुळे व पावसाचा खंड पडल्याने जमिनीतील ओलावा कमी होत असल्यामुळे पिकावर पाण्याचा ताण आहे. त्यामुळे पिक कोमजून जात आहेत सध्यापिके वाढीच्या अवस्थेत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना यासाठी काय उपाय योजना करायच्या यागोष्टीवर मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे परंतु, यंदाच्या कृषी हंगामात कृषी सहायक व अधिकारी सापडेनासे झाले आहे. शेती व्यवस्थापनाचे धडे शेतकऱ्यांना मिळेनासे झाले आहे. आमचा कृषी विभाग कठे गेला अश्या चर्चातुन विचारणा शेतकऱ्यांकडून होत आहे. . योजनांकडे विभागाचे दुर्लक्ष
कृषी विभागाच्या वतीने महाडीबीटी, ठिबक व तुषार सिंचन योजना, प्लास्टिक अस्तरीकरण, कृषी यांत्रिकीकरण आदी योजना राबविल्या जातात. यंदा या योजनांकडे विभागाचे दुर्लक्ष आहे.
यापूर्वी कृषी विभागाचे
अधिकारी थेट शेतावर येऊन
मार्गदर्शन करायचे. परंतु, यंदा कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळत नाही.
– ज्ञानदेव काकडे , शेतकरी.
या वर्षी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पी. एम. किसान सम्मान निधीचे काम सोपविले आहे. त्याचेही शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले नाही -बालासाहेब नाईक , शेतकरी..
