रक्तदान शिबीर हे समाज उपयोगी – प्रा. मनोहर धोंडे
हनुमंत लांडगे हे भावी नगरसेवक -आ. हंबर्डे
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा
लोहयात शिवा संघटनेचे लोहा तालुकाध्यक्ष हनुमंत भाऊ लांडगे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व भव्य रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी हनुमंत भाऊ लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त शाल पुष्पहार घालून केक कापून हनुमंत भाऊ लांडगे यांना भरवून अभिष्टचिंतन केले व त्यानंतर हनुमंत भाऊ लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.
यावेळी कंधार पंचायत समितीचे माजी सभापती बालाजीराव पांडागळे, लोहा न.पा.चे माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, शिवा संघटनेचे नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख इंजि. अनिल माळगे , नगरसेवक प्र.जीवन पाटील चव्हाण, शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कालीदास मुस्तापुरे, शिवा कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानोबा घोडके सर, दहिकळंबाचे सरपंच अवधूत पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे म्हणाले की, शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष हनुमंत भाऊ लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवित रक्तदान शिबीर ठेवले आहे त्याबद्दल मी हनुमंत भाऊ लांडगे व त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो .
हा कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर आम्ही पिंजऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी नांदेडचे खासदार यांनी १५कोटी रुपये निधी देण्याचे जाहीर केले होते पण त्यांचे आश्वासन हवेतच विरले. याकडे न.पा.ने लक्ष द्यावे.
हा कार्यक्रम दरवर्षी लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होतो.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य अश्वरुढ पुतळा बसविण्यात आला आहे. हा पुतळा बसविण्यासाठी शिवा संघटनेने लढा दिला होता व त्या लढ्याला यश आले यात आम्हाला राजकारण करायचे नाही. नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी हा पुतळा बसविला व आता त्यांच्या काळात लोहा न.पा.च्या प्रगणांत जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा ही पुतळा बसविण्यात यावा आणखी त्यांचा कार्यकाळ बाकी आहे. लोकशाही आहे त्यांनी कुणाला भिऊ नये हनुमंत भाऊ लांडगे यांचे अभिष्टचिंतन करण्यास लपुन येऊ नये. नगराध्यक्ष व त्यांच्या टीमचे चांगले काम आहे.
या रक्तदान शिबिरातील रक्तदान केलेले रक्त हे सर्व जाती धर्माच्या लोकांना शेतकरी शेतमजूरांच्या कामी येणार आहे हे हनुमंत भाऊ लांडगे यांना पुण्य आहे. हनुमंत भाऊ लांडगे यांनी शिवा संघटनेच्या माध्यमातून लोहा तालुक्यात व नांदेड जिल्ह्यात अनेक जिव्हाळ्याचे मित्र तयार केले आहेत. रक्ताच्या नात्यापेक्षा विचाराचे नाते महत्वाचे आहे ते आपण जोपासणे गरजेचे आहे असे प्रा. मनोहर धोंडे म्हणाले.
तसेच यावेळी नांदेड दक्षिण चे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी ही हनुमंत भाऊ लांडगे यांचा शाल पुष्पहार घालून वाढदिवसानिमित्त सत्कार केला व ते म्हणाले हनुमंत भाऊ हे भावी नगरसेवक आहेत त्यांचे काम अतिशय चांगले आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असे आ. मोहन अण्णा हंबर्डे म्हणाले.
तसेच लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी ही हनुमंत भाऊ लांडगे यांचा शाल खारिक खोबऱ्याचा हार घालून पेढे भरवून अभिष्टचिंतन केले.
तसेच यावेळी या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन यावेळी ६१ जणांनी रक्तदान केले व सदरील रक्त संकलन नांदेड येथील जिजाई रक्तपेढी ने केले.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम भाऊ घोडके, शिवा सोशल मीडिया चे तालुकाध्यक्ष राजकुमार पिल्लोळे, शिवा संघटनेचे तालुका उपाध्यक्ष साधू पाटील वडजे, शिवा व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मानसपुरे, बेद्रे सर, दगडगावे सर यांच्या सह शिवा संघटनेच्या लोहा तालुका शाखेच्या मावळ्यांनी परिश्रम घेतले.
तसेच हनुमंत भाऊ लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव लोहा शहर व तालुक्यातील मित्रमंडळी, व्यापारी, पत्रकार , शेतकरी आदीनी केला आहे.
