
आज महंत डाँ.नामदेव शास्री किर्तनसेवा लाखो भाविकांची उपस्थिती…..
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी वैजापुर भारत पा.सोनवणे …
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर)- शिऊर ( ता.वैजापूर)येथील श्री संत शंकरस्वामी महाराज संस्थान फडाचा २७८वा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षीं स्वामीच्या समाधी स्थळाच्या आवारात चालू आहे.या सप्ताहात लाखो भाविक ज्ञानदान व अन्नदान मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहे आज श्री.हभप न्यायाचार्य नामदेव महाराज शास्री (महंत भगवानगड) यांच्या किर्तन सेवेतून लाखो भाविकांनी ज्ञान अम्रुताचा लाभ घेतला अन्नदानासाठी वैजापूर,गंगापूर, कन्रड , नांदगाव तालुक्यातील तब्बल ११० गावातून भाकरी येत आहे. तर आमटी सप्ताहस्थळी करण्यात येत आहेत
सोमवारी हभप सारंगधर महाराज भोपळे ( शास्री) यांच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होईल व सार्वजनिक महाप्रसादाचे वाटप होणार आहेत