
दैनिक चालु वार्ता
उपसंपादक मोहन आखाडे छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातील ग्राहकांचे हित
जोपासण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक सरंक्षण समिती गठीत करण्यात आली आहे. या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. रमेश तारगे यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली
डॉ. रमेश तारगे हे गेल्या वीस वर्षांपासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर काम करत असून, शेतकऱ्यांना
पीक कर्ज, फळ पीकविमा आदीसाठी त्यांनी आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. २१ ऑगस्ट रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर – पालवे यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर नियुक्त करण्यात आलेल्या शासकीय अधिकारी तसेच अशासकीय सदस्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. यात डॉ. रमेश तारगे यांची ग्राहक संघटनेचे अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.