
लाखो लाभार्थी : आनंदाचा शिधा देण्याची शासनाकडून घोषणा दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी नादेइ (देगलूर): गोरगरीब नागरिकांनाही सण- उत्सव आनंदात साजरा करता यावा, या उद्देशाने यावर्षीही गणपती आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानांवरुन ‘आनंदाचा शिधा दिला जाणार आहे.
गोरगरीब नागरिकांसाठी रेशन दुकानांवरुन बाजारभावापेक्षा कमी दराने अन्न-धान्याचे वितरण केले जाते. सणाच्या काळात रेशन दुकानावर लाभार्थ्यांची मोठी रांग लागते. बाजारभावापेक्षा कमी दराने रेशन मिळत असल्याने गरीबांचा फायदा होतो. आता सणांचा काळ सुरु झाला आहे. गणशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सव १ आणि दिवाळीत रेशन दुकानांवरुन आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शंभर रुपयांमध्ये रवा, साखर, चनाडाळ आणि तेल है। साहित्य मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची चिंता मिटली आहे. कोणाला मिळणार आनंदाचा शिधा ?
अंत्योदय, प्राधान्य कुटूंब आणि शेतकरी गटातील लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. रेशन दुकानांमधून त्याचे वाटप केले जाणार आहे. १०० रुपयांत काय मिळणार?
आनंदाचा शिधा मध्ये १०० रुपयांमध्ये लाभार्थ्याला ए किलो रखा, एक किलो साखर, चनाडाळ आणि एक लिटर तेल मिळणार आहे. त्यामुळे १०० रुपयांमध्ये गोडधोड करता येणार आहे. गोरगरीबांचा सण उत्साहात साजरा केला जावा, या उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतला आहे.