दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड (देगलूर): जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील बांधव मनोज जरांगे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यासह आरक्षण उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज देगलुरच्या वतीने
आज दिनांक 04 सप्टेंबर सोमवार रोजी देगलुर बंद साठी पदयात्रा सुरुवात
आण्णा भाऊ साठे चौका पासून होऊन सराफा मार्केट , मोंढा मार्केट , भवानी चौक , हनुमान मंदिर , लोहिया मैदान , भट्गल्लि शाळा , भगत सिंघ चौक , जुने बस स्टँड , हैद्राबाद नांदेड़ रोड ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत काढुन संपन्न होऊन देगलुर कडकडीत बंद आंदोलन करण्यात आले .
या आंदोलनात सर्व पक्षांच्या, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला व लाठीचार्ज चा निषेध व्यक्त केला. यावेळी आ.जितेश अंतापुरकर, माजी आमदार सुभाष साबणे, भाजपचे लोकसभा मतदारसंघ प्रमुख व्यंकटराव पाटील गोजेगावकर , शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार,काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष माजी सभापती शिवाजीराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अंकुश देशाई , शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे, काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष बालाजी थडके , राष्ट्रवादी काँग्रेस युवा लोकनेते अविनाश निलमवार , कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती गिरीधर पाटील सुगांवकर ,संभाजी ब्रिगेड जिल्हाउपाध्यक्ष राहुल थडके देगांवकर,संभाजी ब्रिगेड चे डॉ. सुनील जाधव , शिवसेना देगलूर शहर प्रमुख बालाजी मैलागिरे , माजी नगरसेवक नितेश पाटील व शैलेश उल्लेवार, राष्ट्रवादी काँग्रेस नाना मोरे व विकास नरबागे,काँग्रेसचे युवा मतदार संघाचे प्रमुख जनार्दन बिरादार, सामाजिक कार्यकर्ते खालिद पटेल तडखेलकर, शरीफ मामु , मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष गजू पाटील , अँड अंकुश राजे जाधव ,युवा सेना तालुका समन्वयक शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख भागवत पाटील सोमुरकर, दिलिप पाटील सुगांवकर, सदाशिव शिंदे आमदापुरकर, बस्वराज पाटील वन्नाळीकर , चेअरमन रमेश पाटील, युवा सेना तालुका प्रमुख संतोष जाधव भुतनहिप्परगेकर पांडुरंग थडके देगांवकर, युवा सेनेचे सुमन थडके देगांवकर सुनील पाटील थडके देगांवकर, भाजपचे युवा नेते नामदेव पाटील थडके , धिरज पाटील , संभाजी ब्रिगेड चे तालुका प्रमुख जेजेराव पाटील करडखेडवाडीकर, भरत पाटील मरखेलकर, राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते शिवकुमार डाकोरे, शशांक पाटील , सुमित कांबळे , राजु पाटील मलकापूर कर , रंजित पाटील हिंगोले कुशावाडीकर कर, सल्लागार रमेश जी जाधव , देविदास थड्के , नारायण वड्जे ,नंदा ताई देशमुख , जिजाऊ ब्रिगेड च्या संजीवनी ताई सुर्यवंशी , रंजना ताई मानुरे , संगीता ताई कदम , दिपाली ताई पाटील , विष्णू पाटील मलकापूरकर , गजू पाटील , नागराळकर , नवनाथ पाटील, भारतीय मराठा महासंघाचे जयपाल वर्खिण्डे आदीसह शेकडो पदाधिकारी उपस्थितीत होते .यावेळी पोलिस प्रशासनाने बंदोबस्त चोख ठेऊन सहकार्य केले .
देगलुर बंद मध्ये महिला, तरुण , ज्येष्ठ नागरिक , सर्व स्तरातील समाज बांधव, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शेतकरी , व्यापारी , दुकानदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली . अत्यावश्यक सेवा वगळता
ईतर सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने , हॉटेल , शाळा,कॉलेज, कोचिंग क्लासेसने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून कडकडीत बंदला प्रतिसाद दिला .
