
प्रश्न न सुटल्यास पुन्हा आंदोलन करण्याची ग्रामस्थांचा इशारा…
प्रतिनिधी अंबड ज्ञानेश्वर साळुंके
दहा तारखेपर्यंत आरक्षण द्या अन्यथा जालना वडीगोद्री रस्ता बेमुदत बंद करणार अंबड तालुक्यातील मौजे लालवाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आज भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले शासनाला दहा तारखेपर्यंत विदर्भाच्या धर्तीवर मराठवाड्यातील मराठ्यांना इतर मागासवर्गात आरक्षण देऊन कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा कडून मराठा समाजातील सुशिक्षित बेकार तरुणांना सरसकट बिन व्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे तसेच अंतरवाली सराटी येथील मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे त्वरित पाठीमागे घ्यावे अशा प्रमुख मागण्या संदर्भात लालवाडी पाटी येथे एक तास मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको करून अंबड चे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले प्रसंगी उपस्थित मराठा बांधव प्रदीप शिंदे लखन शिंदे रामू काका शिंदे ज्ञानेश्वर चव्हाण अमोल कामटे करण चव्हाण दत्ता शिंदे अर्जुन शिंदे दादाराव शिंदे विष्णू उगले सचिन बगाटे योगेश बगाटे बाबुराव शिंदे युवराज उगले अशोक डोळे गणेश शिंदे सचिन जाधव गोरखनाथ कदम मनोज शिंदे अर्जुन जाधव सचिन शिंदे शिवाजी शिंदे प्रवेश बगाटे यासह असंख्य मराठा बांधव सहभागी झाले होते त्यामुळे लांबच लांब गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या प्रसंगी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता…