
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड (देगलूर) –
सर्वसामान्य कुटुंबात जन्मास येऊन राजकारणाची व्याख्या बदलत देगलूर सारख्या प्रस्थापितांच्या शहरात सर्वोच्च पदावर आपली कारकीर्द गाजवत आपल्या संपूर्ण राजकीय जीवनात समाजसेवा हाच एकमेव परम धर्म असल्याचे मानत समाजसेवा करणाऱ्या कै.मष्णाजीराव निलमवार यांच्या सोबत आमचे राजकारणा पलीकडचे संबंध होते . आपल्या राजकीय जीवनात सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी या लोकनेत्यांनी आपलं जीवन वेचल तसेच राजकारण करीत असताना तू या पक्षाचा तू त्या पक्षाचा असा भेदभाव कै.मष्णाजीराव निलमवार यांनी कधी केला नाही त्यामुळेच आज एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक इथं जमा झाले असून त्यांनी केलेल्या लोकसेवेची हीच पावती आहे .लोकनेते कै.मष्णाजीराव निलमवार साहेब यांच्या ११ व्या पुण्यस्मरण दिना निमित्त आज देगलूर नागरपरिषेदेत अभिवादनाचा कार्यक्रम पार पडले. या अभिवादनाच्या कार्यक्रमात माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर अतिशय सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या न कोणता राजकीय वारसा न कोणती राजकीय पार्श्वभूमी अशा परिस्थितीत आपल्या महाविद्यालयीन जीवनापासूनच समाजसेवेची आवड असणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपल्या सहकाऱ्यांची एकमुठ करून आपल्या महाविद्यालयीन जीवनात सलग ५ वर्ष विद्यार्थी परिषदेचं प्रतिनिधित्व करीत अध्यक्ष राहिले. शिक्षण पूर्ण करीत त्यांनी देगलूर नगर परिषदेची निवडणूक लढविली व एका बलाढ्य अशा विरोधकाचा पराभव केला त्यांनतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. तसेच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले. आपल्या कार्यकाळात दोन वेळा नागराध्यक्षपद भूषविले.शहरात राष्ट्रवादी पक्ष पेरण्यांच काम लोकनेते कै.मष्णाजीराव निलमवार साहेब यांनी केले विशेष म्हणजे त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन समाजपयोगी कामे केली तसेच आपल्या राजकीय कार्यकाळात अनेक बेरोजगारांना त्यांनी नौकरी लावली तर अनेकांना त्यांनी आधार दिला.
या कार्यक्रमासाठी देगलूर शहरातील लोकनेत्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते, मित्रवर्ग ,व्यावसायिक,शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी देगलूर – बिलोलीचे आमदार जितेशभाऊ अंतापुरकर,देगलूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर, नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण, माजी नगराध्यक्ष मोगलाजीअण्णा शिरशेटवार,माजी नगराध्यक्ष विवेक केरूरकर,माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार,माजी उपनगराध्यक्ष बालाजी रोयलावार,माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार,माजी उपनगराध्यक्ष बालाजी टेकाळे,माजी उपनगराध्यक्ष बिस्मिल्लाभाई कुरेशी,माजी नगरसेवक निसार देशमुख,माजी नगरसेवक वाय.जी सोनकांबळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, माजी नगरसेवक प्रशांत दासरवार,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अंकुश देसाई आदी मान्यवरांची उपस्थिती होती.