
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड (देगलूर);दि.७/९/२३ रोजी विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली.या निमित्ताने विद्यालयातील सर्व विद्यार्थी राधा कृष्ण वेशभूषेत उपस्थित होते.या प्रसंगी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर , ज्येष्ठ शिक्षिका स्मिता कुलकर्णी व कार्यक्रमाच्या वक्त्या म्हणून सुरेखा तोटावार उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीकृष्ण व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले.उपस्थित मान्यवरांचे पुष्प देवून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी वैयक्तिक पद्य अनिता देवगीरे यांनी सादर केले.
यानंतर वक्त्या तोटावार बाईंनी मुलांना गोपाळकाला विषयी मुलांना मार्गदर्शन केले. पूर्ण अवतार भगवान म्हणजे श्रीकृष्ण. जगाला धर्म म्हणजे काय? हे गीतेतून जगाला पटवून देणारे श्रीकृष्ण.जी व्यक्ती गीता श्रवण करेल त्याचे जीवन सार्थक व तो कृष्णभक्त झाल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले.
कृष्णाचे विचार,रामाचे आचार व हरीचे नाम घेणे म्हणजे कृष्ण भक्ती होय.
अध्यक्ष समारोपात देगावकर सरांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सर्वांना गोकुलष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर राधा कृष्ण वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी बाल लीला सादर केले.गीत व नृत्य सादरीकरण झाले.शेवटी बाल गोपाळ व गोपिकांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.सर्व विद्यार्थ्यांना गोपाळकाला प्रसाद वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन कलोपासक मंडळ प्रमुख सविता बेजगमवार यांनी तर दही हांडीचे नियोजन बलोपसक मंडळ प्रमुख रुपा पांचारे यांनी केले.या कार्यक्रमचे सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले…