
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी स्वरूप गिरमकर
पुणे वाघोली : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरा नगरीत देवकीच्या आठव्या अपत्याच्या रूपात कंसाच्या कैदेत झाला. जन्माष्टमीच्या दिवशी घरोघरी श्रीकृष्णाच्या बालस्वरुपाची पूजा केली जाते. भाविक भजन आणि कीर्तन गात या दिवशी उपवास करतात, तसेच भव्य सजावटही करतात.
श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने घरोघरी बाल गोपाळांचा जन्म झाला आहे. सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत होता . हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल कीच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाले होते . श्रीकृष्णाचा भक्त बालगोपाळांच्या पूजेत तल्लीन होता . भगवान श्रीकृष्णाचा जन्म होताच घराघरात अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. असं मानलं जातं की ज्या पद्धतीने तुम्ही घरातील लहान मुलाला झोपण्यासाठी अंगाई गाता. त्याचप्रमाणे बाळ कृष्ण गोपाळांनाही एक अंगाई गा. कारण आई यशोदा सुद्धा कान्हाची झोप उडवण्यासाठी लोरी गात असे. लोरीमध्ये तुम्ही भक्तीगीते किंवा फक्त कान्हाची लोरी गाऊ शकता.
विठ्ठल मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव साजरा….
विठ्ठल मंदिरात रात्री 12 वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी असंख्य विठ्ठल भक्ताने या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. यापूर्वी विठुरायाला अनोख्या रुपात सजविण्यात आले होते. डोक्यावर पगडी, अंगावर अंगी, धोतर आणि त्यावर मोठी कुंची घालण्यात आली होती. गुरख्याचे रूप दिलेल्या विठुरायाच्या हातात काठी देऊन देवाच्या मागे मोरपिसे लावण्यात आली होती. विठुराया हा विष्णूचा अवतार असल्याने विठ्ठल मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला .विठ्ठल सभामंडपात जन्माष्टमीचे कीर्तन सुरू असताना रात्री 12 वाजता पाळण्यात कृष्ण जन्माचा उत्सव करण्यात आला. यावेळी भाविकांनी देवाच्या पायावर गुलाल, अष्टगंध वहात दर्शन घेतले.
यावेळी विविध सोसायटीचे चेअरमन,ग्रां सदस्य, सोसायटी संचालक, ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता . दहिहंडी फोडून सदर कार्यक्रमाची सांगता करणेत आली.