
दै.चालु वार्ता
पेठवडज प्रतिनिधी गजानन जाधव
नांदेड (पेठवडज) :- पेठवडज ता.कंधार जि नांदेड येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला बसलेले संभाजी पाटील गोंधळे व एकनाथ पाटील डावकोरे या उपोषणकर्त्यांना माजी जि.प.अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर यांनी भेट देवुन तब्येतीची विचारपूस केली व प्रशासनाला उपोषणकर्त्याची तब्येत खालावल्यामुळे प्रशासनाला संपर्क करून उपोषणकर्त्याची काळजी घेण्याची विनंती करण्यात आली व त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी राजू पाटील रावणगावकर (तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी मुखेड), भालचंद्र नाईक (उपजिल्हाप्रमुख शिवसेना), हरीचंद्र राजे पाटील, संदिप घाटे तुपदाळकर(सरपंच),आनंदा पाटिल दामले, गजानन पाटील जाधव, एकनाथ कारभारी, संजय डावकोरे, इरफान तांबोळी, पपू दामले तसेच सकल मराठा समाज पेठवडज यांची उपस्थिती होती.