
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी शितल रमेश पंडोरे छत्रपती संभाजीनगर
औरंगपुरा येथील संत सावता महाराज मंदिरात माजी आमदार नारायणराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी समन्वय समितीची बैठक झाली. यात ओबीसींच्या विविध मागण्यांसंदर्भात १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० पासून क्रांती चौकात धरणे आंदोलन, निदर्शने करून अन्नत्याग,आंदोलनाची सुरुवात होणार झाकली अन्नत्याग करणाऱ्यांमध्ये रामभाऊ पेरकर, जनार्दन कापुरे, संदीप घोडके व साईनाथ जाधव यांचा समावेश राहील, तर धरणे आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांनी केवळ निदर्शने व धरणे आंदोलनास परवानगी दिली आहे.
मंडल आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे ओबीसींची जातनिहाय जनगणना होत नाहीय. ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासही सरकार संरक्षण देऊ शकलेले नाही. याबाबत समाजात मोठी नाराजी असल्याने हे आंदोलन छेडण्यात असल्याची भूमिका समाजाच्या वतीने घेण्यात आली आहे.
या मेळाव्यात राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य अॅड. बी. एल. किल्लारीकर यांच्यासह बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याण दळे, भाजपच्या ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस बापू घडमोडे आदी मान्यवर सहभागी झाले होते. ओबीसी आंदोलकांनी केलेल्या प्रमुख मागण्या मराठा जातीला सरसकट कुणबी संबोधून ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये. राज्यात जातनिहाय जनगणना करण्यात यावी. मराठा जातीला कुणबी म्हणून दिलेली जातींची प्रमाणपत्रे रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी.
ओबीसी (व्हीजेएनटी, एसबीसी) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी. व्यावसायिक अभ्यासक्रमांची बंद असलेली शिष्यवृत्ती सुरू करावी. सरकारी उद्योगांचे खासगीकरण थांबवावे. सरकारी नोकऱ्यांच्या खासगीकरणाचा अध्यादेश रद्द करावा.नरेद्र सांगळे सह कुष्णा घुले सह कार्यकर्ता उपस्थित होते…