दै.चालु वार्ता
भोकर प्रतिनिधी विजयकुमार चिंतावार
पांडुरणा येथिल शेतकऱ्यांच्या गोठ्यातून दावे तोडून गायी चोरून इतरत्र विक्री करण्याच्या उद्देशाने घेवून जाणाऱ्या ४ जणांच्या टोळीतील ३ जणांना रिठ्ठा गावात सरपंच व गोरक्षकांनी पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले.
थोडक्यात माहिती अशी की पांडुरना येथील शेतकरी संजय धोंडींबा बरकमकर यांची शेती पांडुरणा शिवारामध्ये भोकर मुदखेड रोडवर असून ते आपल्या नौकरासह रात्रीला आखाड्यावरती जनावरांच्या देखभाली करीता असतात त्यांच्याच आखाड्यावरील बांधलेल्या दोन गाई पहाटे तीन वाजताच्या सुमारास चोरटे टेम्पोत टाकुन भोकर कडे नेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी आरडाओरड करुन जवळच्या शेजाऱ्याना जागे केल्याने शेतकरी जागे झाल्याचे चोरट्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पांडुरणा घाटामध्ये गाई सोडुन पळण्याचा प्रयत्न केला असता रिठा येथील सरपंच परसराम करंडेकर व गोरक्षक यांना संपर्क करुन झालेला प्रकार सांगितला असता त्यांनी पळुन जाणारा आशोक लिलन्ड कंपनीचा पिक अप टेम्पो क्रमांक एम.एच. २६ बिई. ६८०४ सह रिठ्ठा येथे नांदेड देगलुर नाका येथिल रहिवाशी असलेल्या तिघांना पकडुन भोकर पोलिसांच्या ताब्यात दिले असून
भोकर पोलिसांनी शेख सलमान शेख निसार वय १८
अब्दुल रहिम मोहरा कुरेशी वय १८,मोहम्मद अरबाज अब्दुल वहाब १८ या
तिघांना ताब्यात घेतले असून
शेख इकराम उर्फ वाजीद हा पळुन जाण्यात यशस्वी झाला असुन त्या चौघावरती भोकर पोलीस स्टेशन येथे संजय बरकमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३२१/२३ कलम ३७९,३४ भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढिल तपास पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.उप.नि. देवकांबळे हे करित आहेत.