
ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूलच्या मुलांनी पथनाट्य सादर केले…
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
नादेड (देगलूर):दि. 13 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त तहसील कार्यालय देगलूर अंतर्गत शालेय पथनाट्य घेण्यात आली यावेळी ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूल रामपूर रोड देगलूर या विद्यालयातील इयत्ता नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला पथनाट्य सादरीकरण झाल्यानंतर माननीय उपजिल्हाधिकारी श्री कुलदीप जंगम, तहसीलदार श्री राजाभाऊ कदम यांनी व्यक्तिशः उपस्थित राहून पथनाट्य सादरीकरण पाहिले..