
आमदार जितेश अंतापूरकर यांच्या हस्ते उद्घाटन.
नांदेड (देगलूर): देगलुर उपजिल्हा रुग्णालयात आयुष्यमान भव: आयुष्यमान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर साप्ताहिक आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. ह्यात नागरिकांना निदान आणि मोफत औषधोपचार, आयुष्यमान मेळावा, रक्तदान, क्षयरोग कुष्ठरोग निदान, माता बाल आरोग्य निदान, नेत्र व दंत निदान, नाक कान घसा, शस्त्रक्रिया, मानसोपचार अजुनही बरेचशे आजाराव घरोघरी देखील सेवा पुरविण्यात येतील
हे सर्व कार्यक्रम आठवड्या नुसार योजना राबविण्यात येतील. आणि या बरोबर रुग्णालयातील यांत्रिक उपकरणे देखील लवकरात लवकर चालु करण्यात येणार आहे त्याची देखिल पाहणी केली. तरी या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा….तसेच गरजुंना माहिती द्यावी.असे आव्हान बिलोली देगलूर मतदार संघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांनी जनतेला केले.