
भोत्रा येथील सकल मराठा समाजाच्या एक दिवशीय धरणे आंदोलनास विवीध संघटना, समाजाचा पाठींबा…
दैनिक चालु वार्ता
परंडा प्रतिनिधी धनंजय गोफणे
परंडा दि. १३ (प्रतिनिधी) – समाजाला सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळावे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली इथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून त्यांच्या समर्थनार्थ भोत्रा येथील सकल मराठा समाज, ग्रामस्थांच्या वतीने एक दिवस प्रतीकात्मक लाक्षणिक उपोषण ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्यात आले.
जोपर्यंत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश शासन जारी करत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही. खरे, सच्चे आणि कडवट मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला बळ देण्यासाठी भोत्रा गावातील सकल मराठा समाजाच्या महिलाग्रामस्थ, तरुण अशा सर्वांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ एक दिवसीय शेकडोच्या उपस्थितीमध्ये लाक्षणिक उपोषण केले.
यावेळी उपोषणास बसलेल्या समाज बांधवानी शासनाला विनंती केली की सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे ते लवकरात लवकर देण्याचा अध्यादेश जारी करावा. त्याचबरोबर सकल मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहु नये अश्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
लवकरात लवकर अध्यादेश जारी केला नाही आणि मराठा समाजाला जर न्याय दिला नाही तर येणाऱ्या काळामध्ये मराठा आमदार, खासदारांवर नामुष्कीची वेळ येईल आणि जनता तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही अशा तीव्र भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.
शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये समाजाचे अत्यल्प प्रमाण पाहता मराठा समाजाला आरक्षण देवुन कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळावे. हाच मराठा समाजाच्या भवितव्याच्या हिताने न्याय आहे. सरकारने याची दखल घ्यावी आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे. अशी मागणी भोत्रा येथील सकल मराठा समाज बांधवांनी यावेळी केली.
या वेळी जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है , आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, कोण म्हणतय देत नाही,आम्ही घेतल्याशिवाय राहात नाही, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणानी परिसर दनानुन सोडला होता.किंवा सकल मराठा समाजासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने पाठींबा देण्यात आला. तसेच
कोळी समाज भोत्रा धनगर समाज भोत्रा यांच्या वतीने ही जाहीर पाठींबा देण्यात आला..