
प्लास्टिक मुक्त करू अभियान…
दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे.
दि 26 सप्टें (पिंपळे गुरव) पुणे.
पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक ते रामकृष्ण मंगल कार्यालय पर्यंत पालिकेच्या ड प्रभागाच्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त गणेशोत्सवाचे औचित्य साधून 15 सप्टेंबर ते 2 ऑगस्ट स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्यालय मंत्रालय( M0HUA) यांच्या संयुक्त अनुषंगाने अभियान राबविण्यात आले. यावेळी उपस्थित मंडळाच्या पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, पालिकेचे कर्मचारी, बेसिक टीमचे पदाधिकारी तसेच नागरिकांना श्रीराम डुकरे यांनी प्लास्टिक मुक्तीची शपथ दिली.
मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की 500 वर्षे नष्ट न होणाऱ्या प्लास्टिकचा वापर न करण्याचे व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करून मनुष्य आपली निर्मिती आपणच करतो आणि पर्यावरणावर आघात करून स्वतःचा ऱ्हास स्वतःच करत असतो आणी “प्लास्टिकच्या कचऱ्याला लावू नका काडी, घरी येईल घंटागाडी” कावळा म्हणतो काव काव, एक तरी झाड लाव. असे म्हणत अण्णा जोगदंड स्पीकर मधून समस्त नागरिकाना आव्हान करत होते.
आरोग्य निरीक्षक बी.आर. कांबळे यांनी पिंपळे गुरव येथील गणपती विसर्जनचा घाट स्वच्छ करून घाट प्लास्टिक मुक्त केल्याचे सांगितले . यावेळी स्वच्छता मोहिमेची सांगता विसर्गन घाट येथे ड प्रभागामध्ये स्वच्छतेच्या व पर्यावरणावर काम करणाऱ्या मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड सदिच्छा महिला बचत गटाच्या अध्यक्षा राखी वाजांनी ,
नवचैतन्य हास्य योग परीवार, यांना ड प्रभागाच्या वतीने उत्कृष्ट कार्याबद्दल आरोग्य निरीक्षक बी.आर .कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक योगेश फल्ले यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी क्षेत्रिय अधिकारी किरण कुमार मोरे ,सहाय्यक आरोग्य अधिकारी महेश आढाव, आरोग्य निरीक्षक बी.आर.कांबळे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, बेसिक टीमचे झोनल ऑफिसर रोहित चंदेल, नवचैतन्य हास्य योग परीवार,सदिच्छा बचत गटाच्या अध्यक्षा राखी वाजांनी, संगीता जोगदंड, एस.पीज हास्य परीवाराचे अँड प्रताप साबळे, विविध मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पालिकेचे आरोग्य विभागाचे व बेसिक टीमचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.