
हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे अजित पवार यांनी छत्रपती संभाजी नगरचा दौरा रद्द केला असल्याची माहिती समोर येत आहे. आमदार सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विकास कामांचा उद्घाटनाचा आयोजन करण्यात आले होते. तसेच, 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते होणार होते.हे साहित्य संमेलन गंगापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.मराठा समाजाच्या विरोधामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
*मराठा आंदोलकांने दिले होते निवेदन*
मराठा साहित्यसंमेलनात कुठल्याही राजकीय नेत्यांनी येवूनये यासाठी निवेदन देण्यात आले होते. अजित पावरासह इतरही राजीकीय नेत्यांना येण्यास विरोध यात केलेला आहे.आमचा साहित्य संमेलनास विरोध नसून त्या ठिकाणी संमेलनाच्या आडून काही राजकीय मंडळी स्वतः चा प्रचार करून घेत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यापासून मराठा प्रश्न प्रलंबित आसताना शासनाने अजून ही मराठा समाजाला ओबीसि मधून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास तयार नाही.आमचा सकल मराठा समाजाचा यास विरोध असून, शांततेत लोकशाही मार्गाने आम्ही राजकीय पुढाऱ्यांना विरोध करणार आहोततरी प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचा विचार करता राजकीय मंडळीना त्या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करावा. अन्यथा होणाऱ्या परिणामास प्रशासन व प्रशासकीय अधिकारी जवाबदार असतील याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले होते.
दरम्यान, असे असतांना आता अजित पवारांनी आपला दौरा रद्द केला आहे.