दै.चालु वार्ता
उस्माननगर ( प्रतिनिधी )
लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- कापसी (बु) ता. लोहा येथे गावाच्या दक्षिणेस
भगवान वडवळे यांची शेती असून त्या शेतीमध्ये त्यांनी गजरा गवताची लागवड केलेली आहे. दि. ०१ डिसेंबर २०२३ रोज शुक्रवार तेथील चारा घेण्यासाठी गेले असता त्यांना त्याठिकाणी उग्र स्वरूपाचा वास येत असल्याचे जाणवले त्यांनी आजूबाजूला पाहिले असता गजरा गवतामध्ये कुजलेल्या व सडलेल्या अवस्थेत अर्धवट शरीर असलेला व कुत्र्यांनी लचके तोडलेल्या स्थितीत शिर धडावेगळे असलेल्या स्थितीत असलेला मृतदेह त्यांना आढळुन आला.त्यांनी याची माहिती गावातील पोलीस पाटील दयानंद कांबळे यांना दिले .त्यांनतर याची माहिती उस्माननगर पोलीस ठाण्यास कळवण्यात आली.
माहिती मिळताच उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे , पोलीस उपनिरीक्षक प्रभू केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर , बीट जमादार श्रीमंगले,
हे त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.व घटनास्थळाचा पंचनामा केला. मृत व्यक्तीच्या खिशात आधार कार्ड आढळुन आले चौकशी केली असता सदरील व्यक्ती ही ऊसतोड कामगार असून कंधार तालुक्यातील भुत्याचीवाडी येथील
रहिवासी अशोक सूर्यभान गटमवाड यांचे वय ३३ वर्षे हा व्यक्ती गेल्या १४ नोव्हेंबर पासुन कामासाठी जात आहे असे सांगून घरातून बेपत्ता होती असे निष्पन्न झाले.सदरील व्यक्ती हरवल्याची तक्रार उस्माननगर पोलीस ठाण्यात दि.१७ नोव्हेंबर रोजी नातेवाइकांच्या वतीने देण्यात आली होती. मृताच्या नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. प्रेत जास्त सडलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच सोनखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आली यांनी प्रेताची उत्तरीय तपासणी करून प्रेत नातेवाइकांच्या स्वाधीन केले. दि.०१ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मृत अशोक गटमवाड यांच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलं असा परिवार आहे.
उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभू केंद्रे हे पुढील तपास करीत आहेत.
