
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/लोहा:– प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शनिवार दि.०९-१२-२०२३ ते शनिवार दि. १६-१२-२०२३ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह निमीत खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.पहाटे ४ ते ६ काकडा आरती व भजन, स. ६ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा भजन, दुपारी २ ते ३.३० कलंबर (बु.) येथील महिला मंडळाचे भजन,सायं. ४ ते ५ ज्ञानेश्वरी प्रवचन सायंकाळी,५ ते ६ हरीपाठ व रात्री ९ ते ११ हरिकिर्तन व रात्री ११ ते ४ हरी जागर होईल.दि.९ डिसेंबर रोजी
श्री ह.भ.प. घनश्याम महाराज बेटकर (नामदेव म. संस्थान उम्रज) यांचे किर्तन व श्री ह.भ.प. दत्ता महाराज सोरगे यांचे प्रवचन होणार आहे.१० डिसेंबर रोजी श्री ह.भ.प.अर्जुन महाराज ताटे यांचे किर्तन व श्री ह.भ.प.डॉ.सौ.वर्षाताई डांगे यांचे प्रवचन होणार आहे.११ डिसेंबर रोजी श्री संत ज्ञानेश्वर म. समाधी सोहळ्या निमीत्त गुलालाचे कीर्तन १० ते १२ ह.भ.प. विकास महाराज आळंदीकर व रात्री ९ ते ११ श्री ह.भ.प. नारायण महाराज शास्त्री (नामदेव म. संस्थान उम्रज) यांचे किर्तन व श्री ह.भ.प. माधव महाराज घोरबांड यांचे प्रवचन होणार आहे.१२ डिसेंबर रोजी श्री ह.भ.प. रोहीदास महाराज कळकेकर | (नामदेव म. संस्थान उम्रज (शिक्षक) यांचे किर्तन व श्री ह.भ.प. गजानन महाराज चिकाळकर यांचे प्रवचन होणार आहे.१३ डिसेंबर रोजी श्री ह.भ.प. भगवान महाराज शेंद्रेकर यांचे किर्तन व श्री ह.भ.प. रोहीदास महाराज आहेरकर यांचे प्रवचन होणार आहे.१४ डिसेंबर रोजी श्री ह.भ.प. पंढरी महाराज हडोळीकर यांचे किर्तन व श्री ह.भ.प. बचाटे गुरुजी यांचे प्रवचन होणार आहे.१५ डिसेंबर रोजी श्री ह.भ.प. रंगनाथ महाराज ताटे यांचे किर्तन व श्री ह.भ.प. स्वाती ताई तुप्पेकर यांचे प्रवचन होणार आहे.१६ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ श्री ह.भ.प. त्र्यंबक महाराज दस्तापुरकर यांचे काल्याचे किर्तन होईलव नंतर महाप्रसाद होईल. यानिमित्त परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी विनंती समस्त गावकरी मंडळी भोपाळवाडी ता.लोहा यांनी केली आहे.