
दै.चालु वार्ता
पेठवडज प्रतिनिधी आनंदा वरवंटकर
नांदेड/कंधार :-कळका येथील कमल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.या वेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल सिरसे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषण केले आणि अभिवादन केले.यावेळी संस्थेचे पदाधिकारी व कळका येथील गावकरी उपस्थित होते.