
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहयात राज्य शासनाच्या निषेधार्थ गोरसेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांच्या प्रतिमेस जोडा मारो आंदोलन करण्यात येऊन लोहा तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
पुढे निवेदनात असे नमूद केले की, ८ डिसेंबर २०२३रोजी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान विमुक्त जाती (अ) मधील घुसखोरी थांबविण्याच्या मागणीसाठी जनआक्रोश महामोर्चा काढला होता या मोर्चामध्ये महाराष्ट्रभरातून हजारो समाज बांधव सहभागी झाले होते. मोर्चा संपल्यानंतर निवेदन देण्याची वेळ ३.३० वाजेची होती .पंरतु ३.३० वाजता निवेदन कर्ते निवेदन देण्यासाठी गेले असता बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे हे विधीमंडळात हजर असताना ही निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ दिला नाही व इतर कोणत्याही मंत्र्याने वेळ दिला नाही. त्या घटनेचा निषेध म्हणून गोरसेना व सकल विमुक्ती जाती (अ) च्या वतीने दि.१३ डिसेंबर २०२३ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,बहुमजन कल्याण मंत्री यांच्या प्रतिमेस जोडा मारो आंदोलन करुन खालील मागण्या करीत आहोत.
विमुक्त जाती (अ) प्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थ्यांसह खोटे प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक (एसआयटी) लागु करण्यात यावे , संपुर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैधता पडताळणी समितीमध्ये वि.जा.(अ) प्रवर्गातील एका तज्ञ व्यक्तीस जात वैधता पडताळणी समिती मध्ये शासकीय प्रतिनिधी म्हणून नेमणूक देण्यात यावी, राज्य मागास अहवाल क्र.४९/२०१४ लागु करण्यात यावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्यात.
या निवेदनावर
गोरसेनेचे तालुकाध्यक्ष गोविंद राठोड, सुभाष चव्हाण, गुणाजी चव्हाण,मेरबान पवार, रविराज पवार,ज्ञानेश्वर राठोड, दुर्गातेज पवार, विष्णू चव्हाण, गजानन जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.