
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा / चोंडी : –
आरक्षण लढ्यातील प्रमुख योध्दे मनोज जरंगे पाटील यांच्या सभेच्या तयारी साठी लोहा तालुक्यातील चोंडी येथील मराठा स्वयंसेवक कै. बालाजी पाटील जाधव यांचा मोटारसायकल अपघातात दुर्दैवी निधन निधन झाले. त्यांच्या पश्चात जाधव कुटुंबियांच्या घरी जाऊन सांत्वन पर भेट घेऊन सदर कुटुंबीयांना भाजपा युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा लातूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख, लोहा न.प.चे लोकप्रिय नगरसेवक भास्कर पाटील पवार यांच्या पुढाकारातून जाधव कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात देत सांत्वन केले.
लोहा नगरपालिकेचे लोकप्रिय नगरसेवक भास्कर पाटील पवार यांनी चोंडी येथील जाधव कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात दिला.नगरसेवक भास्कर पाटील यांनी कंधार-लोहा तालुक्यातील जनतेला आव्हान केलं की सदरील जाधव कुटुंबाला सर्वांनी समोर येत पुढाकार घेऊन आपल्या परीने जी मदत करता येईल ती मदत करण्यात यावी असेही पवार म्हणाले.यावेळी पारडी चे उपसरपंच गोविंद पाटील डिकळे,बालाजी पाटील अन्नकाडे,गजानन धोंडे, आदी मित्रमंडळी यांनी सहकार्य केले.