
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/धर्माबाद :- व्हिपीके पतसंस्थेच्या वतीने बाळापूर ता धर्माबाद मयत शेतकरी कै गणेश पाटील सुर्यवंशी यांच्या कूंटुंबियाना शिलई मशीन मदत करण्यात आली. व्हिपीके उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष,तथा नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शेतकरी नेते *मारोतराव कवळे गुरुजी* यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत बाळापूर ता धर्माबाद येथील शेतकरी कै.गणेश पाटील सुर्यवंशी हा तरुण शेतकरी शेताकर्यांचे अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या दुःखात सहभागी होत सांत्वन पर भेट देवून त्यांच्या कुटुंबीयांना शिलई मशीन मदत केली.व्हिपिके पतसंस्था ही नांदेड जिल्हात कार्यरत असतांना ही संस्था आपला केवळ नफा न पाहता झालेल्या नफ्यातून अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते त्यांचाच एक भाग म्हणून आज बाळापूर येथे मदत केली.यावेळी वसंतराव जाधव, मोहनराव पाटील सुर्यवंशी, फेरोजभाई पटेल धर्माबाद शाखेचे शाखा व्यवस्थापक रेडशेटीवार साहेब, संतोष पिलेवाड सह बाळापूर येथिल आदीजन उपस्थित होते.