
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
मुंबई :- ज्येष्ठ पत्रकार तथा कराळे समाचार व जनमत मराठवाडा या मराठी वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रय वामनराव कराळे यांना “नारायण पेंडणेकर स्मृती पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.
‘एकता कल्चरल अकादमी’ या नोंदणीकृत’ संस्थेतर्फे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मागील २५ वर्षांपासून कला, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्राला वाहून घेतलेल्या या संस्थेतर्फे राज्य स्तरावर कार्यरत विविध क्षेत्रातील निवडक नामवंतांचा प्रत्येक वर्षी ‘एकता पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येत असतो.
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बाबत अकादमीच्या निवड समितीने २०२३-२०२४ सालासाठी *”नारायण पेंडणेकर स्मृती”* या पुरस्कारासाठी पत्रकार दत्तात्रय कराळे यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याचे लेखी पत्र संस्थेतर्फे पाठविण्यात आले आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दिनांक १३ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ठिक ४ वाजता मुंबई, गिरगाव मधील ‘साहित्य संघ नाट्यगृह’ येथे आयोजित करण्यात आला आहे.
परभणी महानगर मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय कराळे यांना यापूर्वी ‘छत्रपती शिवाजी महाराज समता राज्यस्तरीय पुरस्काराने’ मुंबई येथे गौरविण्यात आले आहे. त्याशिवाय विविध संस्था, संघटना, मंडळं आणि राजकीय क्षेत्रामधून श्री.कराळे यांना आतापर्यंत २७ पुरस्कार मिळाले आहेत.
वसई-विरारसह मुंबईतील विविध क्षेत्रांमधील अनेक नामवंत ‘एकता कल्चरल अकादमी’ या संस्थेवर कार्यरत आहेत. गोर-गरीब, गरजू, आदिवासी, वंचित, दीन दलीत, पद-दलितांच्या उन्नतीबरोबरच त्यांच्या भावी आयुष्यातील जडण-घडणीसाठी या संस्थेने आतापर्यंत उल्लेखनीय असे कार्य केले आहे.