
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार:- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी (दक्षिण माहूर) पेठवडज ता.कंधार जि. नांदेड येथे श्री.गुरुमुर्ती तपोवनिधी संत आनंदबन गुरु केवळबन महाराज दत्त संस्थान निळेगव्हाण शाखा पेठवडज व श्री संत प.पु. आनंदबन गुरु उद्दतबन महाराज दत्त संस्थान निळेगव्हाण यांच्या कृपा आशीर्वादाने व तसेच श्री.संत बालयोगी देवपुरी महाराज मठ संस्थान कहाळा (खु.) यांच्या शुभ आशीर्वादाने (दक्षिण माहूर) पेठवडज येथे ४५ वा दत्त जयंती सोहळा
दि.२०.१२.२०२३ रोज बुधवार पासून सप्ताहास सुरुवात ते मिती मार्गशीष शु.१४ दि.२६.१२.२०२३ रोज मंगळवार दुपारी ठिक १२:०० वा. दत्त जन्म सोहळा संपन्न होईल आणि पालखी मिरवणूक निघेल व महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होईल.
सप्ताहातील दैनिक कार्यक्रम
पहाटे ३ ते ६ आनंदाचा पारा-भूपाळी व काकडा आरती, सकाळी १० ते १ महापूजा, भजन सायंकाळी ५ ते ७, नवनाथ ग्रंथाचे पारायण व रात्री ९ ते ११ कीर्तन व महापूजा.दररोज रात्री किर्तन राहील.
दि.२०डिसेबर बुधवार रोजी द.भ.प. श्याम सुंदरगीर महाराज अष्टीकर हदगाव.
दि.२१.डिसेबंर गुरूवार रोजी द.भ.प. प्रताप पाटील नटुरे पिंपळकौठा. दि.२२.डिसेबंर शुक्रवार रोजी द.भ.प. प्रसाद पाटील धाणकीकर उमरखेड.
२४.डिसेबर शनिवार रोजी द.भ.प. आनंदबन महाराज मठ संस्थान, तुपा.
२५.डिसेबर रविवार द.भ.प. रमेश महाराज माऊलीकर.
२६. डिसेंबर रोजी सोमवार रोजी द.भ.प. मुक्ताईनाथ माऊली उदगीरकर.
बी.पी.शुगर तपासणी व निदान शिबिर…
दि.२४.१२.२०२३ रोज रविवार सकाळी १० ते ४ पर्यंत.
गो माता पुजन…
दि.२५.१२.२०२३ रोज सोमवार
भव्य कुस्तीची दंगल* दि.२७.१२.२०२३ रोज बुधवार वेळ दु.२ वाजता.
कुस्तीचे पहिले बक्षीस १११११/- व दुसरे बक्षीस ७७७७/-
(टिप : ५०० रू. पुढील कुस्तीतुन १०% रक्कम कपात करून पराभुत पैलवानाला देण्यात येईल.)
भजनी सामने…
दि.२६.१२.२०२३ रोज मंगळवार सायंकाळी श्री दत्त भजनी मंडळ ब्राह्मणवाडा ता.जि.नांदेड व हनुमान भक्त भजनी मंडळ रहाटी ता. उमरी जि.नांदेड या दोन भजनाचा कार्यक्रम.
सर्व भाविक-भक्तांनी उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.असे आवाहन दत्त सेवा भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळी, पेठवडज ता.कंधार यांनी केले आहे.