
भीषण अपघातात एकाचा मृत्यू ; सहा जण गंभीर जखमी…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (दर्यापूर) : आमदारांच्या वाहनाने धडक दिल्याने दर्यापूर सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षांचा मृत्यू तर सहा जण गंभीर झाल्याची घटना आज दिनांक २२ शुक्रवार रोजी अमरावती-दर्यापूर मार्गावरील लखापुर फाट्याजवळ सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली.
सदर माहिती प्राप्तीनुसार माजी मंत्री यशोमती ठाकूर व आमदार बळवंत वानखडे समवेत पक्षाचे पदाधिकारी दर्यापूर येथील शाळेच्या स्नेह संमेलन कार्यक्रमाला आमदार यशोमती ठाकूर यांच्या वाहनातून जात असताना त्या वाहनामागे दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बळवंत वानखडे यांचे वाहन क्रमांक एमएच २७ सी क्यु २१२९ येत असताना आमदार वानखडे यांच्या सारथीचे वाहनावरील नियंत्रण चुकले व शेतातील मजुरांना घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.या ईनोव्हा-ट्रॅक्टर च्या धडकेत शेतकरी मो.खलील मो. अमजद (वय ५५) यांचा मृत्यू झाला असून ते दर्यापूर सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सुद्धा असल्याचे समजले.तसेच या अपघातात सुरेश शामराव सावळे (वय ५०) रा.समता नगर दर्यापूर, विमलाबाई जानराव राऊत (वय ५०) रा. टाटा नगर दर्यापूर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना अमरावती येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले व संगिता संजय नांदणे (वय ३५), निता उमेश सावळे (वय ३५) संजय सुरेश इंगळे (वय ५५), लक्ष्मी गोपाल चव्हाण (वय ४५) हे किरकोळ जखमी झाले आहेत.तर आमदार यांच्या वाहनात दीक्षांत पाटील, अंकुश डोंगरदिवे सह दोघे जण प्रवास करीत असल्याचे समजले.