
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : तहसीलदारांनी लखाड येथील उपोषणकर्त्यांना दि.२० रोजीचे उपोषण मागे घेण्यासाठीचे दि.१९ डिसेंबर २०२३ रोजी पत्राद्वारे सूचित करण्यात आले होते व त्यापत्राद्वारे उपोषणकर्त्यांना सांगण्यात आले होते की, संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे तसेच काम थांबविण्यास सांगितले आहे. उपोषणकर्त्यांनी सुद्धा तहसीलदार यांच्या पदाचा मान राखत उपोषण मागे घेतले.परंतु दि.२१ डिसेंबर पासूनच तहसीलदारांच्या मदतीने टॉवर उभारत असल्याची चर्चा तालुक्यातील नागरिकांमध्ये जोरात सुरू आहे. यामुळे याप्रकरणात काय सावळा-गोंधळ आहे हे अद्याप कळले नाही.
दोन दिवसांपूर्वी तहसील कार्यालयात वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांसोबत सुद्धा तहसीलदार यांनी विनाकारण हुज्जत घातली होती. आतातर आपल्या कर्तव्यांना डावलून तालुक्यातील सामान्य नागरिकांचा प्रश्न सुद्धा दावणीला बांधून लखाड येथील नागरिकांना अगोदर पत्र व्यवहाराची कुठलीही रीतसर उत्तर न देता व त्यांच्या प्रश्नांचे निराकरण न करता तहसीलदार यांनी दिनांक १९ डिसेंबर रोजीच्या पत्राद्वारे उपोषणकर्त्यांना दिलेल्या पत्रानुसार उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घ्यावे व संबंधितांवर कारवाई करण्यात आली असे कळविण्यात आले होते. परंतु जेव्हा उपोषण करते संबंधित टॉवर हटविण्याच्या प्रश्नी तहसीलदार यांच्या दालनात गेले असता तहसीलदार यांना उपोषणकर्त्यांनी दि.२२ रोजी निवेदन देऊन म्हटले की, आम्हाला कागदच काळे करावे लागत आहेत.तुमच्या आदेशाचे सदर व्यक्ती व कंपनी कुठलाही मान राखत नाहीत मग तुम्ही तालुका दंडाधिकारी कशासाठी? यावर तहसीलदार यांनी बोलतो, करतो, दोन्ही पक्षकारांना बोलावतो अशा प्रकारची उडवा-उडवीची उत्तरे दिली व त्यांना डावलून लावले.
अगोदर वृत संकलनासाठी गेलेल्या पत्रकारांसोबत हुज्जत व आता सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाचे निराकरण न करता अंजनगाव सुर्जी चे तहसीलदार पदाचा गैरउपयोग तर करीत नाही ना? असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडला असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.