
दै.चालु वार्ता
उस्माननगर ( प्रतिनिधी )
लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ,महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू तथा वंचित बहुजन युवकांचे युवराज , युवा नेते, महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौथी पिढी, बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र लाखो युवकांचे प्रेरणास्थान युवा नेतृत्व युवराज सुजात प्रकाश आंबेडकर यांचे उस्माननगर चौकात दि.२१ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी दोन वाजता नागवंशी मित्र मंडळ व उस्माननगर परिसरातील भीमसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशाच्या गजरात पुष्पहार अर्पण करून जंगी स्वागत करण्यात आले. दि.२१ डिंसेबर २०२३ रोज गुरूवार ह्या दिवशी कंधार मार्ग
लोहा येथील आयोजित निर्धार मेळाव्याला युवराज सुजात आंबेडकर हे मोटर सायकल रॅली द्वारे लोहा येथे वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड जिल्हा दक्षिण आयोजित निर्धार मिळण्यासाठी जात असताना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले
नांदेड हुन रमाता चौक सिडको, ढाकणी ,किवळा, लोढेसांगवी, उस्माननगर, या ५० राष्ट्रीय महामार्गावरील गावा गावातील भीमसैनिकांनी स्वागतासाठी गर्दी केली होती. यावेळी उस्माननगर, शिराढोण, लाठ खुर्द, कापसी , उमरा,गोळेगाव, दहिकळंबा येथील भीमसैनिकांनी स्वागतासाठी उस्माननगर येथील चौकात गर्दी केली होती. याप्रसंगी ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करून भव्य दिव्य स्वागत करुन परिसर घोषणाबाजी ने निनादून गेले होते. सुजात आंबेडकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्वागत स्वीकारून कार्यक्रमास मार्गस्थ झाले.
यावेळी ज्येष्ठ भीमसैनिक तथा माजी उपसरपंच देवरावजी सोनसळे, किशनराव कांबळे, गंगाधर कांबळे, राहुल सोनसळे, अंगुलिकुमार सोनसळे, अंकुश कांबळे, धम्मानंद कांबळे, स्वप्निल कांबळे, हर्षवर्धन सोनसळे ,राहुल किशन सोनसळे ,चांदोबा लोकडे पेनुरकर , माधव भिसे ,तेजस भिसे ,गंगाधर भिसे , आनंदा भिसे सह शिराढोण येथील बौद्धाचार्य मनोज जमदाडे ,सोनकांबळे, यांच्यासह अनेकजन महिला ,पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.