दै.चालु वार्ता
उस्माननगर ( प्रतिनिधी )
लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील जि.प.प्रा.कन्या शाळा येथे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन
यांची जयंती अर्थात राष्ट्रीय गणितज्ञ दिवस म्हणून गणित विभाच्या वतिने दि.२२ डिसेंबर २०२३ रोजी साजरी करण्यात आली. प्रथम या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. हा जयंती सोहळा गणिताचे गाढे अभ्यासक श्रीअनिरुद्ध सिरसाळकर यांच्या व सहकारी शिक्षकांच्या मदतीने अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.गणित दिनानिमित्त कन्या शाळेत सर्वच गणितिचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.या शाळेच्या वतिने दररोज घेत असलेला परिपाठ गणित दिनानिमित्त गणितीय परिपाठ घेण्यात आला, त्यामध्ये गणितीय गाणे, गणित उखाणे, गणितातील गंमतशीर गोष्ट, गणितावरील कुट प्रश्न, बावीस या दिनांका चे महत्व, व इतर अशा अतिशय विविध गणितीय क्रियातून परिपाठ साजरा करण्यात आला, हा परिपाठ साजरा करण्यासाठी शाळेतील विद्यार्थीनी अक्षरा मोरे, गायत्री जाधव, श्रुती कांबळे, अनुजा घोरबांड यांनी अतिशय सुरेख असा परिपाठ सादर केला, त्यानंतर, तालुका तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम आलेल्या अक्षरा मोरे ,गायत्री जाधव व प्रयोगाचे मार्गदर्शक ( शिक्षक ) श्री अनिरूद्ध सिरसाळकर यांचा शालेय समितीतर्फे व शाळेतर्फे शाल,पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला, सत्कार झाल्यानंतर गणिताचे गाढे अभ्यासक श्रीअनिरुद्ध सिरसाळकर यांनी गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जिवनावर प्रकाश टाकला. व गणिताविषयी सखोल असे विद्यार्थीनिंनी मार्गदर्शन केले. त्यानंतर या कार्यक्रमांमध्ये गणित उत्सव शाळेत साजरा करीत असतांना एका संपूर्ण वर्गात गणिती गार्डनचा देखावा उभारण्यात आला, त्यानंतर गणित संकल्पना व संबोधित असलेल्या रांगोळी स्पर्धा मुलींसाठी घेण्यात आल्या, त्यानंतर दुस-या सत्रात गणित संबोधित चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या, या गणित उत्सवात विद्यार्थिनींनी अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. गणित शिक्षक श्री अनिरुद्ध सिरसाळकर यांच्या कल्पनेतून आणि मेहनतीतून व शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांच्या सहकार्यातून हा गणितोत्सव अतिशय उत्साहात पार पडला. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षीका , शालेय समितीचे अध्यक्ष , सदस्य व विद्यार्थींनी उपस्थित होते.
Related Stories
2 hours ago