
अतिक्रमण हटविणाऱ्या पोलिस निरीक्षक चिंचोलकर यांच्या कार्याची जनतेतून प्रशंसा…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : –
लोहा नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील विधुत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर काही भूमाफियांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून टिन पत्राचे शेड उभारून ते गोर गरीब व्यापाऱ्यांना भाड्याने देऊन अमाप किराया वसूल करण्याचे काम सुरू होते. लोहा ठाण्याचे कर्तव्यदक्ष नूतन पोलीस निरीक्षक उमाकांत चिंचोलकर यांनी 23 डिसेंबर रोजी धाडसी कार्यवाही करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याचा फौज फाटा घेऊन महावितरण कार्यालयासमोरील अतिक्रमणावर जेसीबीचा हातोडा फिरविला आहे यामुळे पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीची जतेतून प्रशंसा केली जात आहे अतिक्रमण हटविल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्ते मोकळा श्वास घेत आहेत.
छत्रपती महाराज शिवाजी चौक, लोहा येथे माँब ड्रिल प्रात्यक्षिक घेण्यात आले. सर्व अंमलदार यांना ते कसे फायर करतात, त्याची प्रक्टिस व्हावी याकरिता सराव घेण्यात आला. त्यादरम्यान १ हॅन्ड ग्रीनेड, १ स्टन ग्रीनेड, २ गॅस सेल (लॉन्ग रेंज) व २ बुलेट (रबरी) हवेत फायर करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील विद्युत वितरण कंपनी विभागाच्या कार्यालया समोर मोठ्या प्रमाणावर टीन शेड टाकून अतिक्रमण केले होते. पोलिसांच्या विविध पथकाने एकत्र येऊन अतिक्रमण परिसरात पथसंचलन केले. पुरांचा गोळीबार (डेमो) केला. छत्रपती शिवाजी चौक वर्तुळात चारही बाजूने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाचा वेढा पडला होता. सन १९८० पासून गंगाखेड आणि नादेड रस्त्याच्या कोपऱ्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले होते. हे सर्व अतिक्रमण जेसीबी लावून उध्वस्त करण्यात आले. अतिक्रमण काढत असताना पोलिसांनी डेमो करीत पंचनामा केला हे विशेष होय. अतिक्रमण झालेल्या ठिकाणी महादेव मंदिर काढण्यात आले. बीज वितरण कार्यालयाच्या समोरचे अतिक्रमण काढण्यात पोलीस यंत्रणा दिवसभर व्यस्त होती. अनाधिकृत बस्ती केलेल्या दुकानाचे अतिक्रमण काढले. सदरील अतिक्रमणाची कार्यवाही हि ११ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत पोलिस यंत्रणेच्या बंदोबस्तात चालली.
लोहा शहरात हे राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असुन बाजारपेठ पण मोठी आहे. शहरात अतिक्रमण करुन जनतेला ञास देणारे व जागा दिसेल तेथे अतिक्रमण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी यावेळी दिला.