जिल्हाधिकारी दिले आदेश…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
धानोरा (म) ता. लोहा जि. नांदेड येथील ग्रामपंचायत सदस्यांनी अपहर केल्याप्रकरणी त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्याकडे अपील दाखल करण्यात आले होते या प्रकरणाची सखोल चौकशी करून कांताबाई शिवदास गायकर व मीनाबाई अंकुश राठोड या दोन ग्राम पंचायत सदस्यांचे सदस्य पद जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच रद्द केले.
धानोरा ग्रामपंचायत मधील कांताबाई गायकर व मीनाबाई राठोड यांनी ग्रामपंचायत खात्यातून स्वतःच्या नावे व नातेवाईकांच्या नावे ग्रामपंचायत खात्यातून रक्कम उचलली होती या प्रकरणाविरुद्ध अच्युत बोडारे यांनी सदरील प्रकरणात संबंधिता विरूध्द अर्ज करुन संबंधित विभागाकडे अर्ज बाजारी केली होती त्यावर गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सखोल चौकशी करून या प्रकरणी अहवाल सादर केला या दोघांनी सदरील दोषी असल्याचे आव्हाल दिले त्यानंतर हे प्रकरण ग्रामपंचायत
अधिनियम १९५८ चे कलम १४ अनुसार त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे अपात्रतेसाठी अपील दाखल केले त्यावर जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून सदरील ग्रामपंचायत सदस्य कांताबाई गायकर व मीनाबाई राठोड यांनी सदरील प्रकरणात दोषी असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर हे प्रकरण जिल्हाधिकारी यांच्या कक्षा मध्ये सखोल चौकशी होऊन कांताबाई शिवदास गायकर व मीनाबाई अंकुश राठोड या दोन्ही सदस्य ग्रामपंचायत धानोरांना यांनी अप्रत्यक्षरीत्या ग्रामपंचायतचे आर्थिक व्यवहार हितसंबंध आणि केल्याची दिसून येत असल्यामुळे तसे त्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९९८ चे कलम १४ ग कलमानुसार प्रतिवादी एक व दोन यांना उर्वरित कालावधीसाठी ग्रामपंचायत धानोरा ता. लोहा जि. नांदेड सदस्य पदी अनार्ह ठरविण्यात येत असा आधी जिल्हाधिकारी यांनी दिला सदरील प्रकरण यामुळे संबंध तालुक्यामध्ये जोरदार चर्चा चालू आहे.