
दैनिक चालु वार्ता
किशोर फड प्रतिनिधी बीड
प्रशांत लबडे पाटील अध्यक्ष क्रांतिकारी लाईन स्टाप सेना…
“महाराष्ट्रात वीज पुरवठा करणारी आशिया खंडांतील सर्वात मोठी कंपनी म्हणजे महावितरण.”
“महावितरण मधील तंत्रज्ञ हे विज सैनिक आहेत”:- विजय लाटे वरीष्ठ तंत्रज्ञ महावितरण ”
महावितरणचा कणा म्हटल्या जाणारे जनमित्र तंत्रज्ञ हेच आहेत हे सर्वत्र मान्य असताना मात्र यांच्यावर जो काही नकळत अन्याय होत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी लाईनस्टाफ बचाव कृती समिती यांनी दि ११ डिसेंबर ला आपल्या समस्या मांडत संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनाचे निवेदन नुकतेच मुंबई येथे आझाद मैदानावर ऊर्जा विभागातील सचिव यांना देण्यात आले.
महाराष्ट्रात वीज पुरवठा करणारी आशिया खंडांतील सर्वात मोठी कंपनी म्हणजे महावितरण.
महावितरण आपल्या महाराष्ट्र मधील अति दुर्गम भागातील खेडोपाडी ,वाडी त जेथे चार चाकी, दुचाकी वाहने सुद्धा व्यवस्थित जाऊ शकत नाही तेथे वीज पुरवण्याचे काम तेथील लोकांना वीज पुरवठा देण्याचे कार्य महावितरण कंपनी करते आणि या महत्वाच्या कार्यात अति मोलाचा वाटा असणाऱ्या तंत्रज्ञ ,वरिष्ठ तंत्रज्ञ कुशल लाईनस्टाफ ला महावितरण प्रशासन चपराशी च्या ग्रेड मध्ये ठेवून अन्याय करीत आहे ही फार मोठी शोकांतिका आहे असे क्रांतिकारी लाईन स्टाफ सेना चे अध्यक्ष श्री प्रशांत लबडे पाटील यांनी दै.चालु वार्ता प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
महावितरण मध्ये तंत्रज्ञ लाईनस्टाफ हा एक शिकलेला ट्रेनिंग घेतलेला ITI केलेला असुन कुशल कामगार म्हणून घेतल्या जाते परंतु त्याला वर्ग ४ श्रेणी चतुर्थ श्रेणी मधील चपराशी च्या ग्रेड मध्ये ठेवण्यात आले आहे. व महावितरण मध्येच याच शैक्षणिक अर्हतेवर यंत्र चालक या पदाची नेमणूक वर्ग श्रेणी तीन मध्ये केली जाते मग असा दुजा भाव का? असा प्रश्न सर्व तंत्रज्ञ बांधव यांना पडला आहे.
त्यामुळे महाराष्ट्र मधील सर्व लाईनस्टाफ यांनी मुंबई येथे ११ डिसेंबर ला महामेळावा घेतला त्यात जवळपास पंधरा ते विस हजार तंत्रज्ञ बांधव उपस्थित असल्याचे बोलले जात आहे.त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायावर आक्रोश व्यक्त केला आणि तिथे या मेळाव्याला लाईनस्टाफ च्या हिताचे विचार करणार्या संघटना उपस्थित होत्या. त्यांनी एकमत करून महाराष्ट्र राज्य वीज लाईनस्टाफ बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीने आंदोलनाचा इशारा देत लाईनस्टाफ च्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विनंती केली.
महावितरण च्या सर्व मंडळातील तंत्रज्ञांनी मुंबई येथे आझाद मैदानावर ११ डिसेंबर रोजी महामेळावा आयोजित केला होता त्या ठिकाणी ऊर्जा विभागातील सचिव यांनी हे निवेदन स्वीकारून प्रलंबित मागण्यासाठी काही अवधी मागितला आहे , त्याप्रमाणे यावर लवकरात लवकर तोडगा काढू असे वरिष्ठांमार्फत लाईन स्टाफ कृती बचाव समितीला सांगण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये महावितरण चा कणा तंत्रज्ञ लाईनस्टाफ चे क्रमबद्ध आंदोलन सुरू होते ते १५ जानेवारीपर्यंत प्रशासनाने वेळ मागितल्यामुळे स्थगित करण्यात आले आहे. आता प्रलंबित मागण्या शेवटच्या टप्प्यात आल्या असल्याचे बोलले जात आहे.
मागण्या पुढील प्रमाणे आहेत..
1. महावितरण तंत्रज्ञ लाईनस्टाफ कुशल कामगार असून त्यांना चपराशी च्या वर्ग ४ मधून वर्ग ३ मध्ये टाकण्यात यावे.
2. तंत्रज्ञ लाईनस्टाफ चे शहर असो की ग्रामीण कामाचे तास निश्चित करून शिफ्ट ड्युटी चार्ट प्रमाणे ड्युटी देण्यात यावी.
3. तंत्रज्ञ लाईनस्टाफ चे कामाचे स्वरूप निश्चित नसून ते निश्चित करण्यात यावे.
4. तंत्रज्ञ लाईनस्टाफ यांना स्वतंत्र वेतन श्रेणी देण्यात यावी.
5.तंत्रज्ञ लाईनस्टाफ यांना वाहन पेट्रोल भत्ता 20 लिटर देण्यात यावा कारण त्यांना आता कंपनी कामासाठी ग्राहकांच्या तक्रार निवारण करण्यासाठी स्वतःच्या वाहन ने जावे लागते त्यामुळे वाहन पेट्रोल भत्ता देण्यात यावा.
6.वीज बिल वसुली हे काम सांघिक स्वरुपाचे असल्याने जवाबदारी निश्चित करण्यात यावी.
7. ग्राहकांना वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य सुरक्षित साधने आणि लाईन मेंटेनन्स चे साहित्य पुरविण्यात यावे.
8.कंत्राटी पद्धतीने नोकरभरती न करता सरळसेवा पद्धतीने नोकर भरती करण्यात यावी.
अशा प्रमुख मागण्या लाईनस्टाफ बचाव कृती समिती मार्फत करण्यात आलेल्या आहे.
या मागण्या मान्य झाल्या नाही तर, लोकशाही मार्गाने आंदोलनाची तीव्रता आणखीन वाढेल व महाराष्ट्र राज्यात वीज समस्या वाढतील त्यामुळे
ऊर्जा विभागातील पदाधिकारी हे सुद्धा या मागण्यांचा सकारात्मकतेने विचार करून लवकरात लवकर तोडगा काढतील अशी अपेक्षा लाईन स्टाप कृती बचाव समितीकडून करण्यात येत आहे.