
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (दर्यापूर) :दर्यापूर मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे यांच्या वाहन चालकावर दि.२२ रोजी मो.अर्शद मो.अमजद यांच्या फिर्यादी वरून दर्यापूर पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मो.खालीद मो.अमजद हा शेती पाहत होता.त्याच्याकडे ट्रॅक्टर क्रमांक एमएच २७-६०८५ तात्काळ चुलत भाऊ मो.तारीक मो.हैदर याने घरी येऊन सांगितले की, शेताजवळ अपघात झाला आहे.आम्ही तात्काळ घटनास्थळावर गेलो असता माझ्या भावाला रुग्णवाहिकेत टाकून दर्यापूर रुग्णालयात घेऊन गेले. तर घटनास्थळी एक पांढरा रंगाची गाडी क्रमांक एमएच २७ सी क्यु २१२९ चा चालक अंकुश नागोराव डोंगरदिवे यांनी माझा भाऊ मो.खालीद मो.अमजद याला जोरदार धडक दिली तसेच ट्रॅक्टरमध्ये बसलेले काही मजूर सुद्धा जखमी झाले.
त्यानंतर तसेच आम्ही सर्वजण दर्यापूर सरकारी रुग्णालयात गेलो असता डॉक्टरांनी माझा भाऊ मो.खालीद मयत झाल्याचे सांगितले तसेच या अपघातात एक महिला व एक पुरुष सुद्धा गंभीर जखमी झाल्याने अमरावती येथे रवाना करण्यात आले.तर मयत मो.खालीद मो.अमजद यांचे भाऊ मो.अर्शद मो.अमजद यांनी पोलीसांना दिलेल्या फिर्यादी वरून दर्यापूर पोलीसांनी निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे समोरच्या व्यक्तीला दुखापत तसेच अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू नुसार एम एच २७ सी क्यु २१२९ चा चालक अंकुश नागोराव डोंगरदिवे याच्यावर भांदवी कलम २७९,३०४ अ,३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.