
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी बीड अंबाजोगाई किशोर फड
थोर क्रांतीकारक लहुजी साळवे चौकाचे उद्घाटन राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा मुख्य महासचिव संजय भाऊ भोसले व माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते करण्यात आले…
थोर क्रांतिकारक लहुजी साळवे यांच्या चौकातील नाम फलकाचे उद्घाटन अंबाजोगाई परिसरातील मोरेवाडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा मुख्य महासचिव संजय भाऊ भोसले व माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांच्या समवेत सचिन करनर सर ( येल्डा सरपंच), निळकंठ गडदे (चिचखंडी सरपंच), कल्याण चाटे (उपसरपंच साकुड), लक्ष्मण जोगदंड (सोसायटी माजी चेअरमन मांडवा), मारोती मोरे (ग्रामपंचायत सदस्य मोरेवाडी), स्वप्नील मोरे,महेमुद करीम,शेर अली,कसाब शेख, मन्मथ ईरे, विकास श्रीरसागर,शाहिर राजकुमार, महेंद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.