
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/नायगाव:-मराठा सेवा संघ नायगाव तालुका शाखेच्या वतीने नायगाव येथे मराठा समाजातील वधू वर परिचय मेळावा भव्य दिव्य स्वरूपात घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार मा. वसंतराव पाटील चव्हाण उद्घाटक नायगाव तहसीलदार शिवमती मंजूषा भगत मॅडम, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.संतोष देवराये, जिल्हाध्यक्ष उद्धवराव पाटील सुर्यवंशी जिल्हासचिव रमेश पवार, नायगाव तालुकाध्यक्ष अशोक पवळे, सचिव संतोष कल्याणे यांच्यासह अशोक पाटील बावणे, राजू पाटील बावणे, माजी गटशिक्षणाधिकारी एम.जे. कदमसह मोठा समाज बांधव भगिनी उपस्थित होते..
या वधूवर परिचय मेळाव्यात जवळपास २०० वधूवरासह आई-वडीलांनी परिचय दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष तथा माजी गटशिक्षणाधिकारी शिवश्री अशोक पाटील पवळे, सचिव शिवश्री संतोष कल्याणे ,कार्याध्यक्ष डी टी जाधव, डी एस पवार व नायगाव येथील सर्व टिमने परिश्रम घेतले.