
दै.चालू वार्ता
पैठण प्रतिनिधी,तुषार नाटकर-
दि. 4 जानेवारी गुरुवार रोजी जि. प. प्रशाला मुलांची पैठण येथे जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी विकास मिना, व शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या संकल्पनेतून पंचायत समिती पैठण गटशिक्षणाधिकारी केदार यांच्या वतीने पालकांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पैठण तालुक्यातील पैठण बीट, पाचोड बीट, जायकवाडी बीट, व बिडकिन बीट,मधिल महिला व पुरुष यांचे कबड्डी व खो-खो चे सांघिक खेळ घेण्यात आले. यामध्ये कबड्डी महिला गटात पाचोड बीट ने प्रथम क्रमांक पटकावला तर पुरुष गटात जायकवाडी बीट ने प्रथम क्रमांक पटकावला. खो-खो पुरुष गटात पाचोड बीटने प्रथम क्रमांक पटकावला, तर महिला गटात पाचोड बीट ने प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी उद्घाटक म्हणून तहसीलदार सारंग चव्हाण होते तर प्रमुख पाहुणे म्हणून किशोर चव्हाण चेअरमन शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्था पैठण, जेष्ट शिक्षण विस्तार अधिकारी, प्रकाश लोखंडे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पुदाट हे होते, त्यांच्या हस्ते फित कापून व नारळ फोडून उद्घाटक करण्यात आले. पंच म्हणून वसंत ताकटे, लक्ष्मण सपकाळ, नलभे, आबा कणसे, बाळू पाखरे, रावी खेडक, सुनिता जाधव, डुकरे यांनी चोक भुमिका बजावली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापकअंकुश गाढे, केंद्र प्रमुख उत्तम खरात, मेजर ताराचंद हिवराळे, समशेर पठाण, राजेश पाखरे, ज्ञानेश्वर वाडेकर, नलभे, थोटे, सोमनाथ टाक, नवनाथ घटे, नाचन, घोडके, सपाटे, शिंदे, भोसले, नितीन कपटी, अंबादास बोराडे, वैशाली कुटे, भुमरे, खोचे सह आदिं उपस्थित होते.