[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
पुष्प ११० वे
ज्ञानदेव आत रुसून बैसले । भावंडे सिद्धबेटी व्यथित झाले ।।
न उघडी ताटी न बोलती काही । ज्ञान अंतरंग डोकावून पाही ।।
राहोनी बंदिस्त अंतर जाणीले । प्रत्यक्ष मुक्तीने दार ठोठाविले ।।
जरी होय ज्ञान अंतरी पहावे । आनंद वाटून मग आनंदावे ।।
– आनंद
अर्थ ः- ज्ञानराज माऊलींना कधी नव्हे ते ताटी लावून आतमध्ये रुसून बसलेले पाहून भावंडांचा जीव कासावीस होऊ लागला .
ज्ञानोबाराय मात्र काहीही न बोलता ताटी न उघडता आत्मचिंतनात मग्न झाले .
ज्ञानोबारायांच्या या आचरणावरून सिद्ध झाले की ज्याने ज्याने आत्मपरिक्षण करून भक्तीमार्ग स्विकारला साक्षात मुक्तीनेच त्याच्या उन्नतीचे मार्ग प्रशस्त केले आहेत
व्यक्ती ज्ञानी जरी झाला तरी प्रथम त्याने आत्मपरीक्षण करून सुखाचा शोध घ्यावा लोकांना आनंदच वाटावा व स्वतः ही आनंदी रहावे ही शिकवण ज्ञानराज माऊलींनी आचरणातून दिली .
ह भ प आनंद महाराज काकडे
बनसारोळा ८८०५५५०३१५