
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
संतोष मनधरणे
नांदेड ( देगलूर); नांदेड जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे सिद्ध करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील मुखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर तुषार जी राठोड साहेब यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष धनाजी जोशी यांनी प्रक्षश्रेष्ठीकडे केली आहे. नांदेड लोकसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात संपूर्ण मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीची पिचेहाठ झाली आहे आठ पैकी एकाही जागेवर भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही मराठा आरक्षणाच्या जोरावर फटका मराठवाड्यात भाजपला बसला आहे या पार्श्वभूमीवर आगामी मंत्रिमंडळात विस्तारात नांदेड जिल्ह्याला मंत्रीपद देऊन ओबीसी समाजाला सत्तेत सामावून घेण्याच्या हालचाली भाजपच्या वरिष्ठ पातळीवर सुरू झाल्या असल्याने येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात नांदेड जिल्ह्याचा नंबर लागल्यास,मुखेडचे भाजपा आमदार डॉक्टर तुषार राठोड मुखेड यांना येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रीपदी स्थान देऊन समस्त ओबीसी बांधवांना न्याय मिळवून द्यावा,अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष धनाजी जोशी यांनी प्रक्षश्रेष्ठीकडे केली आहे..
सन 2014 ते 2019 या पाच वर्षात राज्याचे मुख्यमंत्रीपद यशस्वीरित्या सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांच्या काळात नांदेड जिल्ह्याला सत्तेत स्थान मिळाले नाही सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नऊ पैकी तीन भाजपाचे आमदार निवडून आले आहेत विधान परिषदेवर राम पाटील रातोळीकर यांची वर्णी लागली आहे यांच्या कार्यकाळात महामंडळाचा लाभही भाजप पदाधिकाऱ्यांच्या नशिबी आला नाही,गेल्या अडीच वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकार मध्ये ही नांदेड जिल्ह्याचा समावेश सत्तेत झाला नाही गेल्या अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्याला मंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. महायुती सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात नांदेड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना सत्तेचा लाभ झाला नाही, विविध शासकीय कमिटी स्थापन झाल्या नाहीत, जिल्हा नियोजन समितीवर भाजपच्या एकाही कार्यकर्त्याची वर्णी लागली नाही, राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी डीपीडीसी वर नियुक्ती करण्यात आली, पण भाजपच्या कार्यकर्त्याची वर्णी लागली नसल्यामुळे राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना सत्तेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. नांदेड जिल्ह्याला कायमस्वरूपी पालकमंत्री गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात भाजपला देता आला नाही, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या रूपाने मोबाईल पालकमंत्री मिळाला असला, तरी त्यांना अडीच वर्षाच्या कार्यकाळात तीन-चार वेळेस जिल्ह्यात प्रत्यक्ष हजेरी लावली तेही झेंडावंदन निमित्त दाखल झाले, राज्यात महायुतीची सत्ता असतानाही नांदेड जिल्ह्याला भाजप कार्यकर्ते सत्तेपासून वंचित राहिल्यामुळे, नांदेड लोकसभेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागून भाजपला दारून पराभवाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे, भाजप पक्ष षष्ठींनी नांदेड जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे भाजपची पीछेआट झाली. जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षणामुळे बहुतांश मराठा समाजाल हा भाजपला सोडून काँग्रेसच्या जवळ गेला आहे, ओबीसी वोट बँक भाजपच्या हातून निष्टुन चालल्याचे चित्र लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाल्यानंतर ,भाजप पक्षश्रेष्ठी डोळे उघडावे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज भाजपपासून दूर गेला असला तरी ओबीसी समाज भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी नांदेड जिल्ह्याला मंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरू कराव्या. नांदेड जिल्ह्यातील एकमेव ओबीसी मोठा चेहरा म्हणून दोन वेळा मुखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार डॉ तुषार राठोड यांना मंत्री करून जिल्ह्यातील ओबीसी बँक मजबूत करण्याच्या हालचाली पक्षाने कराव्या आमदार डॉ तुषार राठोड हे तब्बल दहा वर्षापासून आमदार म्हणून चांगले काम करीत आहेत उच्च उद्या दूषित असलेले डॉक्टर तुषार राठोड हे तरुण तडफदार आहेत भाजपचे नायगाव आमदार राजेश पवार व किनवटचे आमदार भीमराव केराम हे भाजपचे आमदार आहेत या दोन आमदारापेक्षा सलग दोन वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा बहुमान आमदार डॉ तुषार राठोड यांनी मिळवला आहे सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना तब्बल 40 हजाराची मताधिक्य भाजपाला मिळवून देण्यात यशस्वी ठरले आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मताधिक्य मिळवून देणारा एकमेव विधानसभा मतदारसंघ हा मुखेड आहे भाजपच्या विरोधी लाट निर्माण झाली असतानाही भाजपचा मुखेड हा गड शाबू ठेवून चार हजार मताधिक्य मिळवून देण्याचा आमदार तुषार राठोड हे यशस्वी ठरले आहेत बाकी पाचही विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मोठ्या पराभवाने पीछेहात झाली आहे अशोकराव चव्हाण यांच्या भोकर या बालकिल्ल्यातही अवघ्या 500 मतांनी आघाडी मिळाल्यामुळे भाजपचा लोकसभेचा बुरुज ढासळला आहे काँग्रेसची दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण भाजपात दाखल झाल्यानंतर ही लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव हा पक्ष श्रेष्ठींच्या जिवारी लागला आहे आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नांदेड जिल्ह्याला मंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरू कराव्या व आमदार डॉ तुषार राठोड यांची मंत्री पदी वर्णी लागावी व नांदेड जिल्ह्याच्या भाजपात नवचैतन्य निर्माण होऊन विधानसभेत निवडणुकीत घवघवीत यश भाजपला मिळून द्यावे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन मराठवाडा अध्यक्ष धनाजी जोशी यांनी महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे केली आहे